वर्धा : लोकसभा निवडणुकीचे दोन टप्पे धामधूम व आरोप प्रत्यारोपात आटोपले. नेत्यांचे भाषण तसेच गर्दीच्या सभा यामुळे रंगत आली. भाजप नेत्यांनी तर कसलीच कसर नं ठेवता मैदान गाजविले. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेची सर्वाधिक मागणी भाजप उमेदवारांकडून झाल्याचे चित्र होते.
त्या पाठोपाठ उपमुख्यमंत्री असलेले स्टार प्रचारक देवेंद्र फडणवीस यांची डिमांड राहली. स्वतंत्र सभा घेत त्यांनी मतदारसंघ पिंजून काढल्याचे पाहायला मिळाले. आता त्या सभांचा विक्रम होणार, असे म्हटल्या जाते.
हेही वाचा…अकोला : ‘आरटीई’ प्रवेश प्रक्रियेकडे नव्या नियमामुळे पालकांची पाठ, हजारो जागा रिक्त राहणार
कारण केवळ भाजप उमेदवारांसाठीच नव्हे तर मित्रपक्ष राष्ट्रवादी अजित पवार व शिंदे सेना यांचेही उमेदवार त्यांना सभा घेण्याची विनंती करतात. पहिला व दुसरा टप्पा मिळून त्यांनी ४४ व तिसऱ्या टप्प्यातील मतदारसंघात त्यांनी ३० एप्रिल पर्यंत मिळून ५४ सभा घेतल्यात, अशी माहिती फडणवीस यांचे कार्यालयीन प्रमुख केतन पाठक यांनी दिली.
स्वतःच्या सभा त्यासोबतच मोदी यांच्या सभेतही त्यांची हजेरी असतेच. सकाळी ९ वाजता घरून नाश्ता करीत निघाल्यानंतर त्यांची भ्रमंती रात्री साडे दहा पर्यंत चालते. त्यानंतर राजकीय बैठक मध्यरात्री नंतर दोन वाजेपर्यंत असतात. दिवसभरात रात्रीच एक वेळा जेवन. सकाळी आठ वाजता परत आढावा घेऊन दौरा सूरू होत असल्याचे सांगण्यात आले.
हेही वाचा…लोकसभा निवडणूक : तिघांपैकी कोणीही जिंकलं तरी… बुलढाणा मतदारसंघातील चित्र
पहिल्या दोन टप्प्यात रात्रीचा मुक्काम नागपुरात असायचा. मात्र तरीही मुंबईत बैठका होतच असे. आता फडणवीस यांचे मुख्यालय मुंबई असले तरी मुक्काम प्रामुख्याने पुण्यातच असतो.
विविध टप्प्यात फडणवीस यांच्या सभांचे आयोजन झाले व होत आहे. महाराष्ट्रात ७ मे रोजी मतदानाचा तिसरा टप्पा आहे. त्यात रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, कोल्हापूर, हातकणंगले या ठिकाणी मतदान होणार.
हेही वाचा…महात्मा गांधी यांची प्रतीके अन् वर्धा पोलिसांची नाविन्यपूर्ण…
१३ मे रोजीच्या चौथ्या टप्प्यात नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी, बीड या ठिकाणी तर पाचव्या टप्प्यात धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे तसेच मुंबईतील सहा मतदारसंघात मतदान होत आहे. पाचव्या टप्प्यातील प्रचार १८ मे रोजी संपणार. तर या तारखेपर्यंत देवेंद्र फडणवीस सभा घेणार असल्याचे कार्यालयाने नमूद केले. म्हणजेच एकूण सभांची संख्या दोनशेच्या घरात जाणार.
महाराष्ट्र आटोपल्यानंतर उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल येथे मतदान होत आहे. या ठिकाणी सुद्धा फडणवीस यांच्या सभा होणार आहेत. तशी सूचना दोन दिवसापूर्वी मिळते. स्वस्थ बसने नाहीच, अशी टिपणी फडणवीस यांचे विश्वासू सुमित वानखेडे यांनी केली.
हेही वाचा…नागपूर : कामगार दिनी १०८ खासगी सुरक्षारक्षकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड !
महाराष्ट्रसह अन्य राज्यातील सभा धरल्यास फडणवीस यांच्या सभा तिनसो पार जाणार, अशी आकडेवारी आहे. याखेरीज राज्यभरातील भाजप व मित्रपक्षाच्या नेत्यांसोबत खास बैठकी पण त्यांनी घेतल्या. जागा वाटपाचा तिढा शेवटच्या क्षणापर्यंत चालला. त्यात मुख्य भूमिका फडणवीस यांचीच राहल्याचे सांगण्यात आले.