लोकसत्ता टीम
नागपूर : विद्वेष निर्माण करून भाजप समाजात विष कालवत असल्याचा आरोप करीत असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यात शांतता कायम ठेवण्यात अपयशी ठरले आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. बुधवारी पत्रकारांशी ते नागपुरात बोलत होते.
पटोले म्हणाले, फडणवीस यांनी आव्हान स्वीकारून समाजासमाजात सुरू असलेले वाद दूर करावे. भाजप राजकीय लाभ मिळवण्यााठी समाजा-समाजात संघर्षाची स्थिती निर्माण करण्याची चूक करीत आहे. याचा प्रभाव राज्यातील राजकारण निश्चित होणार आहे. भाजपविरोधात जनतेत असंतोष आहे. माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्याबद्दल विचारले असता ते म्हणाले, मुंडे यांची काँग्रेसशी कोणतीही चर्चा झालेली नाही. पण, त्यांची भाजपमध्ये कोंडी होत असल्याची बाब लपून राहिलेली नाही.
आणखी वाचा-‘पुढच्या वर्षी लवकर या’चे साकडे घालत गणरायाला भावपूर्ण निरोप; कृत्रिम तलावाला नागपुराकरांचा प्रतिसाद
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक त्यांचा परदेश दौरा रद्द केल्याबद्दल ते म्हणाले, ही घटनाबाह्य सरकार आहे. त्यांचा दौरा रद्द होणे हे सरकार पडण्याचे संकेत आहेत. भाजपने इतर पक्षांना फोडण्याचे राजकारण केले. पण, नजिकच्या काळात त्यांच्यात फुट पडण्याची शक्यता आहे.