Devendra Fadnavis New CM of Maharashtra : नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत सर्वाधिक जागा (१३२) जिंकणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी नागपूरकर देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्याने महायुतीचे नेते म्हणून तेच नवे मुख्यंत्री म्हणून गुरूवारी शपथ घेणार आहेत. ते विदर्भातील पाचवे व नागपूरचे दुसरे मुख्यमंत्री ठरतील.

नगरसेवक ते राज्याच्या सर्वोच्च स्थानी विराजमान होणारे देवेंद्र फडणवीस नागपूरकरांसाठी देवाभाऊ आहेत. महाराष्ट्राची स्थापना झाल्यावर राज्याचे पहिले मुख्यमंत्री होण्याचा मान दिवंगत यशवंतराव चव्हाण यांना मिळाला होता. त्यांनी दिल्लीत संरक्षणमंत्री म्हणून जाण्याचा निर्णय घेतल्यावर या पदाची सुत्रे वैदर्भीय वसंतराव नाईक यांच्याकडे सोपवली होती. ते विदर्भातील पहिले मुख्यमंत्री होते.नाईक तब्बल११ वर्ष राज्याचे मुख्यमंत्री होते १९६३ ते १९७५ या काळात त्यांनी. राज्यात हरित क्रांती घडवून आणली. त्यांच्या निधनानंतर वैदर्भीय मारोतराव कन्नमावर राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्यांचा कार्यकाळ् एक वर्षाचाच होता. त्यानंतर राज्यात शरद पवार यांचे पर्व उदयास आले. त्यांनी या राज्याचे चार वेळा मुख्यमंत्रीपद भूषवले. त्याचा त्याग करून तेही यशवंतराव चव्हाण यांच्या प्रमाणेच दि्ल्लीत संरक्षणमंत्री म्हणून गेले. दिल्लीला जाताना त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी वैदर्भीय सुधाकरराव नाईक यांच्याकडे सोपवली होती नाईक एक वर्षाहून काही काळराज्याचे मुख्यमंत्री होते. त्यांचे पवार यांच्याशी मतभेद झाल्यावर त्यांना सत्ता सोडावी लागली व पुन्हा पवार राज्याचे मुख्यमंत्री झाले.

New CM of Maharashtra Devendra Fadnavis| BJP announced Maharashtra New Chief Minister
Devendra Fadnavis : मुख्यमंत्रि‍पदाचा मार्ग मोकळा होताच देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “एक है तो सेफ है…”
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
Devendra Fadnavis Speech
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंना टोला, “२०१९ ला जनतेने जो कौल दिला होता त्याच्याशी बेईमानी…”
Eknath Shinde News
Eknath Shinde : एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार का? उदय सामंत यांनी दिलं उत्तर; म्हणाले, “त्यांनी…”
New CM of Maharashtra Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Maharashtra New CM: “चार गोष्टी मनाविरुद्ध होतील, पण…”, सत्तास्थापनेआधी महायुतीबाबत फडणवीसांचं मोठं विधान
political journey Devendra Fadnavis, Mayor, Chief Minister
फडणवीसांचा थक्क करणारा राजकीय प्रवास, महापौर ते मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेता, उपमुख्यमंत्री आणि पुन्हा मुख्यमंत्री
Nirmala Sitharaman
Nirmala Sitharaman : महाराष्ट्रातील निवडणुकीच्या निकालाचं निर्मला सीतारमण यांनाही आश्चर्य; म्हणाल्या, “इथल्या जनतेने…”

हेही वाचा : देवेंद्र फडणवीस राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार; विधीमंडळ पक्षनेतेपदी एकमताने निवड

वसंतराव नाईक यांच्यानंतर पूर्णवेळ पाच वर्ष मुख्यमंत्री म्हणून ज्या वैदर्भीय नेत्यांनी काम केले त्यात देवेंद्र फडणवीस यांचा समावेश आहे. २०१४ -२०१९ असे पाच वर्ष ते या राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर २०१९ मध्ये त्यांना पुन्हा मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली होती. पण शिवसेनेने ऐनवेळी मुख्यमंत्रीपदाची मागणी केली. त्यानंतर महाविकास आघाडीचा प्रयोग झाला. या सर्व प्रकार घडत असतानाही फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अजित पवार यांना सोबत घेऊन पहाटे शपथ घेतली. त्यावेळी ते दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले होते. पण पाचच दिवसात हे सरकार कोसळळे. त्यानंतर ते विरोधी पक्ष नेते म्हणून काम करू लागले. अडिच वर्षात त्यांनी महाविकास आघाडीचे सरकार पाडले. तेव्हा तेच मुख्यमंत्रीहोतील असा अंदाज होता. मात्र ऐनवेळी शिंदे मुख्यमंत्री झाले. २०२४ च्या निवडणुकात भाजपला दणदणीत यश मिळाले. त्यामुळे तेच मुख्यमंत्री होतील हे स्पष्ट होते. बुधवारी त्यावर शिक्कामोर्तब झाले.

Story img Loader