नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा शपथविधी काही तासांवर आला असताना अद्याप संभाव्य मंत्र्यांची नावे जाहीर करण्यात आली नसल्याने नेत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

रविवारी नागपूरमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. दुपारी ४ वाजता राजभवनावर होणाऱ्या या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे. एकीकडे शपथविधीची तयारी सुरू असताना दुसरीकडे मंत्री कोण होणार यांची नावे अद्याप गुलदस्त्यात आहेत. काहीना फोन गेल्याची माहिती आहे पण त्याला दुजोरा दिला जात नाही. विशेषत: विदर्भात शपथविधी आहे. या भागात भाजपचे अनेक प्रबळ दावेदार आहेत. मात्र नावे जाहीर न झाल्याने ते सर्व अस्वस्थ झाले आहेत.

हेही वाचा – काँग्रेसने पराभूत उमेदवारांना नागपुरात बोलावले…निवडणुकीतील मानहानीवर…

खुद्द नागपूरचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले असले तरी दुसरे नाव कुठले याबाबत शपथविधी काही तासांवर आला तरी तर्कवितर्कच लावणे सुरू आहे. भाजपमध्ये याबाबत कोणी जाहीरपणे बोलण्याची हिंमत करीत नसले तरी नेत्यांमध्ये संताप आहे. पक्षश्रेष्ठींची संमती मिळायची आहे या नावाखाली जाणून नावे जाहीर केली जात नाही. यादीला विलंब होणे याचाच अर्थ मंत्रिमंडळाची यादी तयार करताना उलटफेर होणे याचे संकेत आहेत. पक्षांतर्गत विरोधकांना डावलण्यात येणार व समर्थकांची वर्णी लावण्याची ही खेळी आहे, असे भाजपच्या पश्चिम विदर्भातील नेत्यांने सांगितले.

किती मंत्र्यांचा शपथविधी होणार, महायुतीतील तीन घटक पक्षांच्या वाट्याला किती मंत्रीपदे मिळणार हे सारेच अद्याप गुलदस्त्यात आहे. महायुतीतील तिन्ही पक्षांमधील इच्छुक शनिवारी शपथविधीच्या निरोपाची दिवसभर वाट बघत होते.

राज्य मंत्रिमंडळाचा रविवारी शपथविधी होईल, असे सांगण्यात येत आहे. त्याची अधिकृत घोषणा झाली नव्हती. प्रशासनाने नागपूरच्या राजभवनमध्ये शपथविधीची सारी तयारी केली आहे. रविवारी दुपारी ४ वाजता शपथविधी पार पडेल, असे राजभवनाच्या सूत्राकडून सांगण्यात आले. २० ते २५ मंत्र्यांचा समावेश केला जाईल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. भाजपमधील काही ज्येष्ठ मंत्र्यांचा सामावेश केला जाणार नाही. त्याऐवजी नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाईल, असे समजते. भाजपच्या यादीबाबत मुख्यमंत्री फडणवीस हे केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करून नावे अंतिम करणार आहेत. राष्ट्रवादीने मुख्यमंत्र्यांकडे नावे पाठविण्यात आली आहेत. अजित पवार यांनी आपले पत्ते खुले केलेले नसल्याने जुने आणि नवे दोघेही आमदार संभ्रमात आहेत.

हेही वाचा – Maharashtra Cabinet Expansion Live Updates: आज मंत्रिमंडळाचा विस्तार; भाजपाच्या ‘या’ आमदारांना मंत्रिपदासाठी फोन

सर्वाधिक रस्सीखेच शिवसेनेत

मंत्रिमंडळात आपला समावेश व्हावा यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी शिवसेनेचे इच्छुक जमले होते. प्रत्येकाला पहिल्या टप्प्यात मंत्रीपदाची इच्छा असल्याने शिंदे यांच्यापुढे पेच निर्माण झाला आहे. यातूनच शिंदे यांनी फिरती म्हणजेच अडीच – अडीच वर्षे मंत्रीपदे वाटून देण्याचा तोडगा काढला आहे.

संभाव्य नावे

मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी यांना फोन आल्याची माहिती –

चंद्रकांत पाटील, नितेश राणे, चंद्रशेखर बावनकुळे, मंगलप्रभात लोढा, पंकज भोयर, जयकुमार गोरे, पंकजा मुंडे, शिवेन्द्रराजे भोसले, गिरीश महाजन, जयकुमार रावल, मेघना बोर्डीकर