नागपूर : पाच वर्षात तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे नागपूरकर देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर दौऱ्याचा मुहूर्त वारंवार टळत आहे. पूर्वी १२ डिसेंबरला ते नागपूरला येणार होते, नंतर ही तारीख १३ डिसेंबर झाली आणि आता १५ डिसेंबर झाली आहे.

फडणवीस मुख्यमंत्री झाल्याने नागपूरच्या भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. कधी ते नागपुरात येतात आणि कधी त्यांचा भव्य स्वागत समारंभ आयोजित केला जातो, असे स्थानिक नेते व कार्यकर्त्यांचे झाले आहे. पूर्वी १२ डिसेंबरला ते येणार म्हणून स्वागत समारंभाची तयारी करण्यात आली होती.  स्वागत समिती स्थापन करण्यात आली होती. विमानतळ ते त्यांचे धरमपेठेतील निवासस्थान असा त्यांच्या मिरवणुकीचा मार्ग निर्धारित करण्यात आला होता. मात्र १० तारखेला संध्याकाळी फडणवीस यांच्या दौऱ्यात बदल झाल्याने व ते १२ ऐवजी १३ डिसंबरला येणार, असे शहर अध्यक्ष बंटी कुकडे यांनी जाहीर  केले. १३ तारखेला फडणवीस यांचा जंगी सत्कार होणार म्हणून कार्यकर्ते कामाला लागले असतानाच ते आता १५ डिसेंबरला येणार असे त्यांच्या स्थानिक कार्यालयाकडून सांगण्यात आले.. १६ तारखेपासून विधिमंडळाचे अधिवेशन आहे. त्याच्या पूर्वसंध्येला संपूर्ण  सरकारच नागपूरमध्ये येते. दिवसभर  कॅबिनेटची बैठक, विरोधी पक्षाचे चहापाणी आणि संध्याकाळची पत्रकार परिषद असे बरेच कार्यक्रम दिवसभर असतात. या काळात त्यांचे स्वागत व सत्काराला वेळ मिळण्याची शक्यता कमी आहे.

319 crores received for birth certificates of Bangladeshis and Rohingye says kirit somaiya
“बांगलादेशी, रोहिंग्यांच्या जन्म दाखल्यासाठी ३१९ कोटी आले”… किरीट सोमय्यांनी थेट…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Correlation between geological events and their time
कुतूहल : भूवैज्ञानिक कालमापन
Rescuer brother runs away by leaving mentally ill sister but nandadeep foundation save her life
रक्षणकर्ता भाऊ मनोरुग्ण बहिणीला बेवारस सोडून पळाला… नंददीप फाऊंडेशनने मात्र…
spread of bogus research papers The proposed regulations mention the UGC Care List pune news
बोगस संशोधनपत्रिकांचे पुन्हा पेव? प्रस्तावित नियमावलीत ‘यूजीसी केअर लिस्ट’चा अनुल्लेख
Information from District Collector Kumar Ashirwad that efforts are being made to start Solapur air service
सोलापूर विमानसेवेला लवकरच मुहूर्त; प्रशासनाकडून आवश्यक बाबींची पूर्तता
तर्कतीर्थ विचार: तर्कतीर्थांचे वेदाध्ययन
Technical progress , Visual pollution, thinking attitude,
क्षण आणि मनविध्वंसाच्या टोकावर

हेही वाचा >>>लग्नाच्या हंगामात सोन्याच्या दराने वाढवली चिंता… हे आहे आजचे दर…

मंत्र्यांच्या शपथविधीकडे लक्ष

मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री यांच्या शपथविधीला  आठवडा लोटला तरी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही. सोमवारपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आहे. त्यापूर्वी विस्तार होणे आवश्यक आहे. त्यामुळे फडणवीस मुंबईत अडकून पडले असावे,अशी स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चा आहे. अधिवेशन एक आठवडा चालणार आहे, त्यात वाढ झाली तर फडणवीस यांच्या नागपुरातील सत्काराचा मुहूर्त आणखी काही काळ लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

२०२४ मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यावर फडणवीस यांचा नागपूरमध्ये जंगी सत्कार करण्यात आला होता. विमानतळापासून तर त्यांच्या धरमपेठेतील निवासस्थानापर्यंत त्यांची मिरवणूक काढण्यात आली होती अशाच प्रकारची तयारी याही वेळी भाजप कार्यकर्त्यांनी केली होती,मात्र वारंवार त्यांच्या दौऱ्याची तारीख बदलत असल्याने कार्यकर्त्यांची निराशा होत आहे.

Story img Loader