नागपूर : नागपूरचे सुपुत्र असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विमानतळ ते लक्ष्मीभवन चौक या मार्गावरील विविध चौकांत ढोल ताशांच्या निनादात आणि पुष्पवृष्टी करत नागरिकांनी स्वागत केले. ‘देवा भाऊ आगे बढो, भारतीय जनता पक्षाचा विजय असो’, अशा घोषणांनी विमानतळ परिसर दुमदुमन गेला होता. हॉटेल रेडिसनसमोर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत करत त्यांना शुभेच्छा दिल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रथम नगरागमनानिमित्त भाजपने त्यांच्या स्वागतासाठी शहरात जंगी तयारी केली होती. ठिकठिकाणी मोठे होर्डिंग लावण्यात आले होते. राज्याच्या सर्वोच्च पदाची तिसऱ्यांदा सूत्रे स्वीकारल्यानंतर रविवारी दुपारी १२ वाजता त्यांचे नागपूर विमानतळावर आगमन झाल्यावर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचे स्वागत केले.

हेही वाचा – VIDEO : थरारक… वाघ दुचाकीसमोर आला अन् मग…

यावेळी विमानतळ परिसरात कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यांना लाडक्या बहिणीने औक्षवण केले. देवा भाऊंचा विजय असो… अशा घोषणांनी परिसर दुमदुमन गेला. त्यांच्या स्वागतासाठी पक्षाचे कार्यकर्तेच नाही तर, मोठ्या प्रमाणात मिरवणुकीच्या मार्गावर लाडक्या बहिणी आणि सर्वसामान्य देखील उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे १२ वाजता आगमन झाल्यानंतर त्यांनी विमानतळ परिसरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यानंतर विमानतळ चौकातील हेडगेवार स्मारकस्थळी वंदन केले. त्यानंतर हॉटेल प्राइंड येथून मिरवणुकीला प्रारंभ झाला. देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत पत्नी अमृता फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार कृष्णा खोपडे आदी खुल्या जीपवर होते. यावेळी सोमलवाडा चौक, राजीव नगर चौक, रेडिसन ब्ल्यू हॉटेल चौक, छत्रपती चौक येथून डावीकडे खामला चौक येथून उजवीकडे तात्या टोपे चौक, आठ रस्ता चौक, लक्ष्मीनगर चौक, बजाजनगर चौक, शंकरनगर चौक मार्गाने लक्ष्मीभवन चौक याठिकाणी देवेंद्र फडणवीस यांचे पुष्पवृष्टी करत स्वागत करण्यात आले. लक्ष्मीभवन चौकात विविध लोकनृत्य आणि लेझीम पथकाने कवायती सादर करत त्यांचे स्वागत केले. लक्ष्मीभवन चौकात मिरवणुकीचा समारोप झाला.

सत्ता जनतेची सेवा करण्यासाठी

लाडक्या बहिणी, भाऊ आणि नागरिकांनी आमच्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे महायुतीला विजय मिळाला. आम्ही पूर्वी जमिनीवर होतो आणि सत्ता आल्यावर आता जमिनीवर राहून राज्याचा विकास करणार आणि महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर नेणार आहे. जनतेचे आशीर्वाद माझ्या पाठिशी आहे, त्यामुळे जनतेचे स्वप्न पूर्ण करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हेही वाचा – विमानातून उतरताच बावनकुळेंचा फोन, म्हणाले….; महाजनांनी सांगितला किस्सा

विधानसभा निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर राज्यात आपली सत्ता आली असून महाराष्ट्रात परिवर्तन केले जाणार आहे. माझी जन्म आणि कर्मभूमी असलेल्या नागपूरच्या जनतेने माझ्यावर भरभरुन प्रेम केले आणि आशीर्वाद दिले आहे. सत्ता मिळाली आहे ती जनतेची सेवा करण्यासाठी, आम्ही जमिनीवर राहूनच काम करणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार आणि आमची सर्व टीम दिवस रात्र चौवीस बाय सात काम करुन महाराष्ट्राचा विकास करेल आणि जनतेची स्वप्न पूर्ण करणार आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis nagpur welcome winter session cabinet extension nagpur bjp vmb 67 ssb