राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून ( १९ डिसेंबर ) नागपूरात सुरुवात झाली. गेली दोन वर्ष करोनाने हे अधिवेशन नागपूरात होऊ शकलं नाही. पण, यंदा दोन आठवडे हे अधिवेशन नागपूरात होणार आहे. या अधिवेशनात सत्ताधारी शिंदे सरकारला घेरण्यासाठी विरोधकांनी तयारी केली आहे. त्याचाच प्रत्यत आज दिसून आला. शिवसेनेचे ( ठाकरे गट ) प्रतोद सुनील प्रभू यांनी सत्ताधारी पक्षातील मंत्र्यांच्या बंगल्याला केलेल्या रंगरंगोटीचा मुद्दा उपस्थित केला. याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सभागृहात बोलताना सुनील प्रभू यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, “विद्यमान सरकारमध्ये एकही राज्यमंत्री नाही आहे. तरीही अधिवेशनात राज्यमंत्र्यांचे सर्व बंगले सजवण्यात आले आहेत. या बंगल्यांची आवश्यकता नसताना ते सजवले गेले आहेत. एका बाजूला सरकार प्रकल्पांवरती करोडो रुपयांचं कर्ज उभं करत आहे. दुसऱ्या बाजूला सरकारी पैशांचा चुराडा होत आहे. हा पैशांचा अपव्यय आहे,” असं सुनील प्रभू यांनी म्हटलं

हेही वाचा : संजय राऊतांनी मराठा क्रांती मोर्चाचा VIDEO ट्वीट केल्यावरून अजित पवारांचा सल्ला; म्हणाले, “वस्तुस्थिती…”

सुनील प्रभूंच्या प्रश्नाला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देत मंत्रीपदाची ऑफरच देऊन टाकली. “सार्वजनिक बांधकाम विभागाला थोडीच माहिती असते, आम्ही कधी मंत्रीमंडळ विस्तार करणार आहे. आम्ही अधिवेशनाच्या काळातही करु शकतो. तो मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. तुम्हाला संधी हवी आहे का?, त्यामुळे अधिवेशनाच्या निमित्ताने रंगरंगोटी केली जाते. कोट्यावधी नाहीतर, जेवढे आहेत, त्याचा हिशोब पाठवून देतो,” असं मिश्कीलपणे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis offering ministry thackeray group leader sunil prabhu maharashtra assembly session ssa