२०१९ साली विधानसभेत आणि प्रचारावेळी देवेंद्र फडणवीसांनी ‘मी पुन्हा येईन’चा नारा दिला होता. त्यावरून देवेंद्र फडणवीसांवर टीकाही झाली होती. पण, २०१९ साली महाविकास आघाडीचं सरकार आल्याने देवेंद्र फडणवीसांचं स्वप्न धुळीस मिळालं होतं. मात्र, गतवर्षी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करत भाजपाबरोबर सत्ता स्थापन केली. देवेंद्र फडणवीस पुन्हा आले ते उपमुख्यमंत्री म्हणून… अशातच आता ‘पुन्हा येईन’च्या नाऱ्यावरून फडणवीसांनी टोलेबाजी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

“‘मी पुन्हा येईन’ कविता म्हटल्यावर वाटलं नव्हतं, इतकी अडचण होईल”, अशी मिश्कील टिप्पणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ते नागपूरमध्ये पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलत होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मी देखील विधानसभेत ‘मी पुन्हा येईन’ ही कविता केली होती. तेव्हा वाटलं नव्हतं, इतकी अडचण होईल. लोकांनी कविता डोक्यावर घेतली होती. आठ दिवसांत दहा भाषांमध्ये अनुवाद करण्यात आला. त्यानंतर राज्य सरकार आलं नाही. कवितेमुळे राज्य सरकार गेलं, असं सांगितलं गेलं.”

“शेवटी मला हे सांगावं लागलं की, मी जे ‘पुन्हा येईन’ म्हणाला होतो. ते मी पन आलो आणि इतरांनाही बरोबर घेऊन आलो. परवा अजून एकाला बरोबर घेतलं आहे. त्यामुळे वेगवेगळ्या परिस्थितीत कविता प्रत्यय देत असते,” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.