नागपूर : संभाजीनगर-नगर-पुणे असा २३० किलोमीटर महामार्ग बांधण्यासाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालय, राज्याचा सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यात शुक्रवारी नागपुरात सामंजस्य करार करण्यात आला. याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे दूरदृश्य प्रणालीव्दारे उपस्थित होते. राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ हा रस्ता बांधणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कराराच्या कागपदत्रात औरंगाबाद असा उल्लेख आहे. पुणे ते औरंगाबाद २३० किलोमीटर एक्सप्रेस वे उभारण्यात येणार आहे. असे करारात नमूद आहे. यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ब्रीजेश दीक्षित यांना ही चूक दुरुस्त करण्याची सूचना केली. कराराच्या कागदपत्रात औरंगाबाद असा उल्लेख तो दुरुस्त करून संभाजीनगर तातडीने करा, असे फडणवीस म्हणाले.

हेही वाचा…वर्धा : ‘हर्षवर्धन देशमुख नको, समीर देशमुख द्या’, निवडणूक हालचाली वेगात

फडणवीस म्हणाले, पुण्याचे वळण मार्गाचे काम लवकरच सुरू होणार आहे. त्यासाठी आवश्यक भूसंपादन जवळपास पूर्ण झाले आहे. संभाजीनगर ते पुणे नवीन एक्सप्रेस वे पुण्याच्या वळण मार्गला(रिंग रोड) जोडला जाणार आहे. त्यामुळे नागपूरहून संभाजीनगरमार्गे पुण्यात पोहचताना वाहतुकीची कोंडी अजिबात होणार नाही, याची काळजी आधीच घेण्यात आली आहे. प्रस्तावित रस्त्याची लांबी-२३० किमी असून त्यावरून धावणाऱ्या वाहनांसाठी वेग मर्यादा -१२० किमी प्रतितास इतकी असेल. प्रकल्पासाठी ३, ७५२ हेक्टर जमीन लागणार आहे. हा एक्स्प्रेस वे पर्यावरणपूरक, नेट झिरो कार्बन आणि नेट पॉझिटिव्ह ऊर्जा प्रकल्प म्हणून बांधला जात आहे. लवकरच भूसंपादन सुरू केले जाणार आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis orders officials to replace aurangabad with sambhaji nagar in pune aurangabad expressway agreement rbt 74 psg