नागपूर : गडकरी यांचे व्यक्तिमत्त्व प्रसिद्ध अभिनेता राजकपूरसारखे आहे. राज कपूर कधी छोटे स्वप्न बघत नव्हते. गडकरीसुद्धा छोटे स्वप्न कधी पाहत नाहीत आणि हाती घेतलेले प्रत्येक काम देहभान हरपून पूर्ण करतात. त्यांच्यावरील चित्रपटामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक कंगोरे नवीन पिढीपर्यंत पोहोचतील, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोमवारी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जीवनावर आधारित ‘गडकरी’ चित्रपटाचा ‘टिझर’ फडणवीस यांच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आला. हा चित्रपट २७ ऑक्टोबरपासून सर्व चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. यावेळी फडणवीस म्हणाले, गडकरींमधील कामाचा झपाटा आणि ते पूर्ण करण्यासाठी असलेली क्षमता प्रत्येकाने आत्मसात करावी. मुंबई-पुणे एक्प्रेस हायवे पूर्ण करण्याचे त्यांचे कार्य जगासमोर आदर्श म्हणून बघितले जाते. पायाभूत सुविधांच्या निर्मितीचा ‘रोडमॅप’ तयार करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. यावेळी प्रसिद्ध क्रिकेटपटू उमेश यादव याचे भाषण झाले. त्यांनी भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांनी गडकरींच्या कामाचे विशेष कौतुक केल्याचे सांगितले.

हेही वाचा – गोंदिया : बेरडीपार आरोग्यवर्धिनी केंद्र शोभेची वास्तू; पाणी, पक्का रस्ता अन् मनुष्यबळाअभावी लोकार्पणाला मुहूर्तच मिळेना

हेही वाचा – बुलढाणा : “आरक्षणावरून शासनाचे फोडा अन् झोडा धोरण”, बहुजन मुक्तीच्या अधिवेशनात प्रसेनजीत पाटील यांची टीका; म्हणाले…

गडकरी – २ काढावा लागेल

गडकरी यांच्या जीवनातील विविध प्रसंग, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध कंगोरे तीन तासांत दाखवण्याचे कठीण काम या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शकांनी लीलया पार पाडले आहे. या चित्रपटानंतर गडकरी-२ हा चित्रपटसुद्धा प्रदर्शित करण्याची जबाबदारी दिग्दर्शकावर राहणार आहे, असे फडणवीस म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis praised nitin gadkari in nagpur cwb 76 ssb
Show comments