नागपूर: उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीच्या फुटीर गटाचे नेते अजित पवार यांच्यावर पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी केलेल्या आरोपाचे प्रकरण सध्या राजकीय वर्तुळात चांगलेच गाजत आहे. सोमवारी प्रथमच या प्रकरणी फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. फडणवीस एका कार्यक्रमासाठी नागपुरात आले असता माध्यमांनी त्यांना बोरवणकर यांनी अजित पवार यांच्यावर केलेल्या आरोपांबाबत विचारले.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
ते म्हणाले “बोरवणकर यांनी काय आरोप केले याची मला कल्पना नाही. मी त्यांचे पुस्तकही वाचले नाही.” पोलीस निवासस्थानांसाठी राखीव भूखंडाचा लिलाव करण्याबाबत तत्कालीन पालकमंत्री म्हणून दादांनी दबाव आणला होता असा उल्लेख बोरवणकर यांचा पुस्तकात आहे. हे येथे उल्लेखनीय. कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणाची चौकशीची मागणी केली आहे.
First published on: 16-10-2023 at 18:06 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis reaction to meera borwankar allegations against ajit pawar cwb 76 ysh