अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक सलीम कुत्तावरून राजकारण तापलं आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी सलीम कुत्तावरून मंत्री गिरीश महाजन यांना लक्ष्य केलं आहे. गिरीश महाजनांचे दाऊद इब्राहिमचे हस्तक सलीम कुत्ताबरोबर संबंध असल्यानं एसआयटीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी खडसेंनी केली. यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी खडसेंना प्रत्युत्तर देत माफी मागावी, अशी मागणी केली आहे.

एकनाथ खडसे काय म्हणाले?

“१९९३ मध्ये बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोप दाऊद इब्राहिमच्या नातेवाईकाच्या लग्नसमारंभात तत्कालीन पालकमंत्री गिरीश महाजनांसह राजकीय पक्षाचे आमदार, खासदार, नगरसेवक हजर होते. तसेच, गिरीश महाजनांचे दाऊद इब्राहिमचा हस्तक सलीम कुत्ताबरोबर संबंध असल्यानं एसआयटीमार्फत चौकशी करण्यात यावी. सुधाकर बडगुजरांवर तातडीने कारवाई करण्यात आली. तसेच, मंत्र्यांनी मंत्रिमंडळात राहणे कितीपत योग्य आहे? म्हणून सरकारनं तातडीनं चौकशी करावी,” अशी मागणी एकनाथ खडसेंनी विधानपरिषदेत छायाचित्र दाखवत केली होती.

mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
deputy cm devendra fadnavis open up about late Rajendra Patni son dnyayak patni in karanja
फडणवीस म्हणाले, “पाटणी पुत्राची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण…”
Amit Shah made special mention of Devendra Fadnavis in speech in shirala
अमित शहांनी फोन काढला आणि थेट फडणवीसांना लावला… म्हणाले, “पुन्हा…”
devendra fadnavis, public rally, nagpur west assembly constituency
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आम्ही पाकिस्तानमधून उमेदवार…”
loksatta readers feedback
लोकमानस: धोरणांचा प्रचार झालाच नाही
ajit pawar on cm post
अजित पवार म्हणाले, “धरसोड केली तर तुमची विश्वासार्हता राहात नाही”; मुख्यमंत्रीपदाबाबतही तडजोडीची तयारी!
Bhosari assembly, politics, ajit Gavan, Mahesh Landge
भोसरी राजकारण तापलं; महेश लांडगेंच्या तंबीला अजित गव्हाणेंचे प्रत्युत्तर, म्हणाले “पराभवाच्या छायेतून…”

यावर प्रत्युत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “नाशिकमधील मुस्लीम धर्माचे धर्मगुरू ज्यांना ‘शेहरेखातीब’ म्हणतात, त्यांच्या पुतण्याच्या लग्नाला गिरीश महाजनांसह अन्य पक्षांतील नेते आणि अधिकारी उपस्थित होते. शेहरेखातीब यांचा दाऊदशी कुठलाही संबंध नाही. ज्या मुलीशी लग्न झालं त्यांच्या कुटुंबाचाही दाऊदशी कुठलाही संबंध नाही.”

“दाऊदशी संबंध असल्याचा गुन्हा शेहरेखतीब यांच्यावर नाही. तथापी, तेव्हा आरोप झाल्यानंतर तत्कालीन डीसीपीच्या आधारे मी चौकशी समिती नेमली होती. चौकशीनंतर डीसीपीचा अहवालात स्पष्टपणे सांगण्यात आलं की, ‘शेहरेखातीब यांचा दाऊदशी कुठलाही संबंध नाही’,” असं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं.

“उद्धव ठाकरे विधानपरिषदेत आल्यानं अशाप्रकारचे विषय आज आले असतील. पण, खातरजमा न करता एका मंत्र्यावर आरोप करण्यात आले. अशा प्रकारची तडफड बडगुजर सलीम कुत्ताबरोबर नाचताना का दाखवली नाही? मंत्र्यावर बेछूट आरोप केल्यावर एकनाथ खडसेंनी माफी मागितली पाहिजे. त्यांनी केलेले आरोप पूर्णपणे खोटे आहेत,” असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.