अकोला : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना जपानच्या कायोसन विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेटची पदवी प्रदान करण्यात आली. यावरून विरोधकांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली. ‘ठिक आहे, टीका करणारे तेच काम करीत असतात, त्यांच्याकडे लक्ष देण्याची फारशी गरज नसते,’ अशा शब्दात देवेंद्र फडणवीसांनी टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ‘ॲग्रोटेक’ राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी अकोल्यात आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘डॉ. पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न मिळावा, ही राज्य शासनाची भूमिका आहे. मी स्वत:ही यापूर्वीच केंद्र शासनाला विनंती केली आहे. डॉ. पंजाबराव देशमुख हे त्यांच्या कार्यामुळे खऱ्या अर्थाने जनतेच्या मनातील भारतरत्न आहेत. त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा, ही सर्वांचीच इच्छा असल्याने केंद्र शासनाकडे त्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल.’’

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis response to criticism of honorary doctorate degree from japan kaiosan university akola ppd 88 amy
Show comments