नागपूर : महायुतीला भरभक्कम मिळालेल्या यशानंतर पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी पदभार सांभाळा. त्यानंतर प्रथमच गुरुवारी दुपारी ३ वाजता त्यांचे गृहशहरात आगमन होत आहे. त्यांच्या स्वागातसाठी नागपूरकर सज्ज झाले. विमानतळावर स्वागत झाल्यावर लक्ष्मीनगर चौकात जनतेशी संवाद साधणार आहे.

देवेंद्र फडणवीस यांची गटनेते व त्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर शहरात जल्लोश करण्यात आला होता. त्यानंतर प्रथमच आता मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर ते गुरुवारी नागपुरात येत असल्यामुळे त्यांच्या विमानतळावर स्वागतासाठी जय्य्त तयारी केली आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झालायनंतर ते विमानतळ परिसरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करतील. यानंतर विमानतळ चौकातील प.पू. हेडगेवार स्मारक स्थळी वंदन करतील. विमानतळ ते त्यांच्या धरमपेठ निवासस्थानापर्यंत मार्गावर त्यांचे स्वागत केले जाणार आहे. देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच नागपूर शहरात दाखल होत असल्याने कार्यकर्त्यामध्ये उत्साह आहे. त्यांच्या स्वागताची जंगी तयारी केली जात असून सर्वत्र मोठे होर्डीग लावले जात आहे. प.पू. हेडगेवार स्मारक स्थळापासून मिरवणुकीला सुरुवात होईल. सोमलवाडा चौक, राजीव नगर चौक, रेडिसन ब्ल्यू हॉटेल चौक, छत्रपती चौक येथून डावीकडे खामला चौक येथून उजवीकडे तात्या टोपे चौक, आठ रस्ता चौक, लक्ष्मीनगर चौक, बजाजनगर चौक, शंकरनगर चौक मार्गाने लक्ष्मीभुवन चौक येथे रॅली येईल.

Manmohan Singh resume dr Manmohan Singh CV
Manmohan Singh Resume : प्राध्यापक, आरबीआय गव्हर्नर, अर्थमंत्री ते पंतप्रधान…; मनमोहन सिंग यांचा बायोडाटा होतोय व्हायरल, नेमकं त्यात लिहिलंय काय, वाचा
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Image of Manmohan Singh's sister
Manmohan Singh Death : मनमोहन सिंग यांच्या बहिणीची व्यथा, आजारपणामुळे घेता येणार नाही भावाच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन
anupam kher pays tribute to dr manmohan singh
Video : “डॉ. मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिरेखेला…”; अनुपम खेर यांनी व्हिडीओ शेअर करत माजी पंतप्रधानांना वाहिली श्रद्धांजली, म्हणाले…
Manmohan Singh is the second Prime Minister to visit Deekshabhoomi after Atal Bihari Vajpayee
अटलबिहारी वाजपेयींनंतर दीक्षाभूमीला भेट देणारे डॉ. मनमोहन सिंग दुसरे पंतप्रधान होते
satya movie rerelease
‘मुंबई का किंग कौन?…’, २६ वर्षांनी मनोज बाजपेयी यांचा ‘हा’ सिनेमा पुन्हा होणार प्रदर्शित
Chief Minister Fadnavis instructs to provide various services without delay District Good Governance Index Report released
विविध सेवा विनाविलंब उपलब्ध करा; मुख्यमंत्री फडणवीस यांची सूचना; जिल्हा सुशासन निर्देशांक अहवालाचे प्रकाशन
Video of Nagpur Mr Calendar kaka
नागपूरच्या ‘कॅलेंडर’ काकांना तोंडपाठ आहे संपूर्ण कॅलेंडर; अचूक सांगतात माहिती, VIDEO एकदा पाहाच

हेही वाचा…‘मॅट’च्या इतिहासात प्रथमच लोक अदालत,१२६ जणांना नोकरी

लक्ष्मीभुवन चौकामध्ये मुख्यमंत्री जनतेला संबोधित करणार आहे आणि त्याठिकाणी रॅलीचा समारोप होईल.मिरवणुकीमध्ये विविध लोकनृत्य देखील सादर केली जाणार आहेत. मार्गावर विविध मंडळांकडून त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. रेडिसन ब्ल्यू हॉटेल चौकामध्ये भारतीय जनता पार्टी पूर्व नागपूर यांच्यातर्फे तर छत्रपती चौकामध्ये भारतीय जनता पार्टी दक्षिण नागपूर, स्नेहनगर पेट्रोल पंपाजवळ लाडक्या बहिणींकडून औक्षवण, लक्ष्मीनगर चौकामध्ये भारतीय जनता पार्टी मध्य नागपूर, बजाज नगर चौकामध्ये उत्तर नागपूर, शंकर नगर चौकामध्ये पश्चिम नागपूर मंडळाद्वारे स्वागत करण्यात येणार आहे.

हेही वाचा…गावकऱ्यांच्या परिश्रमाने ग्रामपंचायत झाली कोट्यधीश…

संपूर्ण देशात नागपूर शहराची मान अभिमानाने ताठ करणारे शहराचे गौरव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी सर्व नागरिकांनी विमानतळ परिसरात तसेच मिरवणुकीच्या रॅलीच्या मार्गावर देखील मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन भारतीय जनता पक्ष नागपूर शहरतर्फे स्वागत समितीचे संयोजन संदीप जोशी व शहर अध्यक्ष बंटी कुकडे यांनी केले आहे.

Story img Loader