नागपूर : मतदानाची टक्केवारी वाढण्यामागे लाडकी बहीण योजनेला मिळालेला प्रतिसाद नाकारता येत नाही. ही वाढलेली मतदानाची टक्केवारी बघता राज्यात त्याचा महायुती आणि मित्रपक्षाला त्याचा फायदा होईल , असे असल्याचे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे व्यक्त केले. गुरुवारी दुपारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरहून मुंबईला रवाना झाले. यावेळी ते विमानतळावर प्रसार माध्यमांशी बोलत होते. फडणवीस म्हणाले, नागपुरात नाही संपूर्ण राज्यात सर्वत्र मतदानाची टक्केवारी वाढली आहे. या वाढलेल्या टक्केवारीचा नेहमीच भाजपला फायदा झाला असा आजपर्यंतचा आमचा अनुभव आहे. २३ नोव्हेंबरला होणाऱ्या मतमोजणीतून आम्हाला किती फायदा होईल हे समोर येणारच आहे. या निवडणुकीत महिलांची टक्केवारी वाढली आहे. अनेक ठिकाणी फोन करून माहिती घेतली.जवळपास २५ ते ३० बुथवर मी चौकशी केली तेव्हा मतदारसंघात टक्केवारी वाढली असल्याचे दिसून आले आहे.

साधारणत: मतदानाची टक्केवारी वाढल्याची कारणे अनेक असली तरी जनतेध्ये सरकारबद्दल आपुलकी दिसून येत आहे आणि त्याचाच परिणाम ही वाढीव टक्केवारी असल्याचे फडणवीस म्हणाले. एक्झिट पोलवर प्रवक्ते बोलतील एक्झिट पोलवरील आक़डे जे काही असतील त्यावर आमचे व्रवक्ते बोलतील असे फडणवीस म्हणाले अपक्षांसोबत संपर्क नाही काही अपक्षाशी संपर्क साधला का ? असे विचारले असता, अद्याप कोणत्याही अपक्षासोबत आम्ही संपर्क साधलेला नाही, असे त्यांनी सांगितले मुख्यमंत्री पदाबाबत अद्याप निर्णय नाही.

Rahul Narwekar
Rahul Narwekar : संख्याबळ नाही तरीही मविआला विरोधी पक्षनेतेपद देणार का? राहुल नार्वेकरांनी स्पष्टच सांगितलं
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Rahul narvekar
विरोधी पक्षनेतेपदासाठी अद्याप अर्जच नाही, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे स्पष्टीकरण
Rahul Narwekar
विधानसभेला विरोधी पक्षनेता मिळणार का? अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केली भूमिका
Independent MLA Sharad Sonawane.
MLA Sharad Sonawane : अपक्ष आमदाराची महायुतीकडे मंत्रिपदाची मागणी, विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसत झळकावला फलक
Chief Minister Devendra Fadnavis criticizes Sharad Pawar over assembly election defeat pune news
‘संयमाने वागून नेत्यांनी पराभव स्वीकारावा’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शरद पवारांवर टीका
Sharad Pawar asserts that distrust in the electoral system should be removed print politics news
मारकडवाडीवरून कलगीतुरा, निवडणूक यंत्रणेबद्दल अविश्वास दूर करा; शरद पवारांचे मारकरवाडीत प्रतिपादन
Congress Shiv Sena Thackeray faction leaders meet Chief Minister for opposition demand for Assembly Deputy Speaker Leader of Opposition post Print politics news
विधानसभा उपाध्यक्ष, विरोधी पक्षनेतेपदाची विरोधकांची मागणी; मुख्यमंत्र्यांची भेट

हेही वाचा…शिस्त असावी तर अशी… ताडोबातील ते कुटुंब…

मुख्यमंत्री पदाबाबत अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही. निकाल जाहीर झाल्यानंतर आम्ही तिघेही एकत्र बसणार आहे. पदाधिकारी व कार्यकर्त्याच्या भावना असल्या तरी, त्यावर आता कितीहा बोलणार नाही. मात्र त्याबाबचा निर्णय निकाल जाहीर झाल्यानंतर करणार असल्याचे फडणवीस म्हणाले. राहुल गांधी दररोज काही तरी बोलत असतात त्यामुळे त्यावर दररोज काय बोलायचे असे म्हणून त्यांनी राहुल गांधी यांच्यावर बोलणे टाळले.

हेही वाचा…काँग्रेसकडून आमदारांसाठी विशेष विमानाची व्यवस्था; विजयाची शक्यता असलेल्या अपक्ष आमदारांशीही संपर्क…

सरसंघचालकांशी भेट

दरम्यान मतदानाची धामधूम आटोपल्यावर बुधवारी रात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सायंकाळी साडेसहा वाजता संघ मुख्यालयात पोहचले. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली. जवळपास १५ मिनिटे त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर ते संघ कार्यालयातून बाहेर निघाले. त्यानंतर बडकस चौकात येऊन त्यांनी भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला. फडणवीस यांनी दिवसभर दक्षिण पश्चिम मतदारसंघासह अन्य मतदारसंघात भेटी काही बुथवर जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला.संघ मुख्यालयातून बाहेर पडल्यानंतर बडकस चौकात भारतीय जनता पक्षाचे मध्य नागपूरचे कार्यकर्ते उभे होते. त्यामुळे ते काही वेळ चौकात थांबले व कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

Story img Loader