नागपूर : मतदानाची टक्केवारी वाढण्यामागे लाडकी बहीण योजनेला मिळालेला प्रतिसाद नाकारता येत नाही. ही वाढलेली मतदानाची टक्केवारी बघता राज्यात त्याचा महायुती आणि मित्रपक्षाला त्याचा फायदा होईल , असे असल्याचे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे व्यक्त केले. गुरुवारी दुपारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरहून मुंबईला रवाना झाले. यावेळी ते विमानतळावर प्रसार माध्यमांशी बोलत होते. फडणवीस म्हणाले, नागपुरात नाही संपूर्ण राज्यात सर्वत्र मतदानाची टक्केवारी वाढली आहे. या वाढलेल्या टक्केवारीचा नेहमीच भाजपला फायदा झाला असा आजपर्यंतचा आमचा अनुभव आहे. २३ नोव्हेंबरला होणाऱ्या मतमोजणीतून आम्हाला किती फायदा होईल हे समोर येणारच आहे. या निवडणुकीत महिलांची टक्केवारी वाढली आहे. अनेक ठिकाणी फोन करून माहिती घेतली.जवळपास २५ ते ३० बुथवर मी चौकशी केली तेव्हा मतदारसंघात टक्केवारी वाढली असल्याचे दिसून आले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा