वर्धा : माजी खासदार रामदास तडस यांच्या नेतृत्वातील तेली समाजाने केलेल्या मागण्यांना अखेर हिरवी झेंडी मिळाली आहे.मागण्या मान्य केल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, की तेली समाज हा माझाच समाज आहे. हा समाज सदोदित माझा पाठीराखा असल्याने मीही तेली समाजाचा पाठीराखा आहे. ते जेवढी मला मदत करतील त्यापेक्षा डबल त्यांना मी मदत करेन. कोणत्याही पक्षापेक्षा जास्तीत जास्त तेली समाजाच्या बांधवांना भाजप उमेदवारी देण्याचा प्रयत्न करणार. 

केन्द्र व राज्यरकार तेली समाजाच्या खंबीरपणे पाठीशी असुन आपण मागणी केल्याप्रमाणे श्री. संत संताजी जगनाडे महाराज तेली घाणा स्वायत्त प्रतिष्ठाण आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याकरीता आचारसंहितेपूर्वी कॅबिनेटमधे मंजूरी,  उच्चशिक्षण विद्यार्थ्यांसाठी व कँन्सरग्रस्त पिडीतासाठी नवीमुंबई येथे भूखंड, तसेच आपल्या सर्व मागण्या पुर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी उमपुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगीतले.

हेही वाचा >>>गडचिरोली : दक्षिण अबूझमाडमध्ये सात नक्षल्यांचा खात्मा, घटनास्थळी…

३ऑक्टोबर रोजी तेली समाजासाठी १०० कोटींची वेगळी तरतूद असलेले श्री. संत संताजी जगनाडे महाराज तेली घाणा स्वायत्त प्रतिष्ठाण आर्थिक विकास महामंडळ स्थापन, उच्चशिक्षण विद्यार्थ्यांसाठी व कँन्सरग्रस्त पिडीतासाठी नवीमुंबई येथे भूखंड, तसेच विविध मागण्यासंदर्भात महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची बैठक नागपूर येथे  देवेंद्रजी फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष व समाजाचे ज्येष्ठ नेते  चंद्रशेखर बावनकुळे साहेब, प्रांतिकचे प्रदेशाध्यक्ष  रामदास तडस तसेच राज्यातून आलेले विविध पदाधिकारी यांचे समवेत संपन्न झाली. त्यात विविध मागण्या झाल्या. महाराष्ट्रात ओबीसी समाजात लक्षणीय संख्येत तेली समाज असल्याने महाराष्ट्र शासनाने समाजाकरिता स्वतंत्र असे महामंडळ स्थापन करावे व त्यामाध्यमातुन युवकांना व समाजातील घटकांना योजना राबवुन लाभ द्यावा अशी मागणी काल ३ ऑक्टोंबरला नागपूर येथे उपमुख्यमंत्री  फडणवीस यांच्याकडे केली होती.

हेही वाचा >>>अमरावती : धक्कायदायक! वडिलांचा स्वत:च्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

तसेच मागणीचा सकारात्मक निर्णय करुन प्रस्तावीत महामंडळाच्या संबधीत सर्व विषय घेऊन माझ्यासमवेत प्रांतिकच्या पदाधिकारी यांना तात्काळ मुंबई येथे प्राचारण केले व आणि आज संपन्न झालेल्या बैठकीमध्ये विषयाला प्राथमिक मंजुरी देण्यात आली. पुढील काही दिवसात या संबधीत सविस्तर निर्णय निर्गमीत होईल व शासनाच्या भाग भांडवलीसह तेली समाजाच्या विकासाकरिता निर्मीत होईल,अशी प्रतिक्रीया मुंबई येथुन माजी खासदार रामदास तडस यांनी दिली.

महायुती सरकारने या अगोदर बहुप्रलंबीत संत शिरोमणी श्री. संताजी जगनाडे महाराज यांच्या संदुबरे जि. पुणे येथील समाधी स्थळाच्या सर्वागिण विकासाकरिता महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातुन भरघोष निधी तथा विकास आराखडा मंजुर करुन दिला, त्याचप्रमाणे आजच्या मंत्री मंडळ बैठकीमध्ये तेली समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यासाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आल्यामुळे निश्चीत समाजाच्या युवकाना याचा लाभ मिळेल, असे यावेळी माजी खासदार रामदास तडस म्हणाले.