नागपूर : मराठा समाजाला आरक्षण देताना इतर समाजाचे आरक्षण काढणार नाही असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आधीच स्पष्ट केले होते. ओबीसींचे आरक्षण अबाधित ठेवत मराठा समाजाला सरकारने आरक्षण दिले आहे. त्यामुळे ओबीसी समाजात समाधान तर मराठा समाजात आनंद व्यक्त केला जात आहे. त्यामुळे आता जरांगेंनी अट्टहास सोडावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. फडणवीस शुक्रवारी नागपुरात आले असता ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.

फडणवीस म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण सरकारने दिले आहे. त्यामुळे कोणीही जनतेला त्रास होईल असे आंदोलन करू नये. जरांगे पाटील यांना याबाबत सांगण्यात आले असून त्यांनी आता आंदोलनाचा अट्टाहास सोडावा. आरक्षणाबाबत न्यायालयाने काय म्हटले मला माहिती नाही, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – राष्ट्रवादीच्या नव्या चिन्हावर वडेट्टीवार म्हणाले, “तुतारी वाजवायला ‘हात’… ”

हेही वाचा – छोटा पक्षही मोठ्या पक्षाचा जीव घेऊ शकतो याची जाणीव लवकरच भाजपला… – महादेव जानकर असे का म्हणाले?

नागपुरात पर्नोड रिकार्डसमवेत सामंजस्य करार होणार असून त्या कार्यक्रमासाठी आलो आहे. जवळपास २५ हजार कोटींचे करार होणार आहेत. पस्तीस हजार एकरातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. रोजगाराची निर्मिती होणार आहे, त्यामुळे हा महत्त्वाचा प्रकल्प असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Story img Loader