नागपूर : ज्यांनी प्रभू रामचंद्राचे अस्तित्व नाकारले व जे लोक राम खरेच अयोध्येत जन्माला आले होते का, असे प्रश्न उपस्थित करतात, अशांना उत्तर देत नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे स्पष्ट केले.फडणवीस यांनी कारसेवेला जातानाचा त्यावेळचे एक छायाचित्र ‘ट्विट’ केले. त्यावर शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) नेते खासदार संजय राऊत यांनी टीका केली. त्याला फडणवीस यांनी प्रतिउत्तर दिले. ते म्हणाले, ज्यांनी मला हे कारसेवेचे त्यावेळचे छायाचित्र पाठवले आहे त्यांना मी धन्यवाद देतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हे छायाचित्र पाहून मला त्यावेळेच्या स्थितीची पुन्हा आठवण झाली. त्या आनंदात हे छायाचित्र ‘ट्विट’ केले. या छायाचित्रावरुन खासदार संजय राऊत यांनी फडणवीस यांना लक्ष केले. ‘तुमचे हे नागपूर स्टेशनचे फोटो आहेत. आमच्याकडे प्रत्यक्ष घुमटावरचे फोटो आहेत, या शब्दात राऊत यांनी फडणवीस यांचे खिल्ली उडवली.