नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका शाळा, डीग दवाखाना, धरमपेठ, नागपूर येथे मतदानाचा हक्क बजावला. ते सकाळी साडेदहाच्या सुमारास आई आणि पत्नी सोबत मतदान केंद्रावर पोहोचले. मतदान केल्यानंतर त्यांनी माध्यम प्रतिनिधीशी संवाद साधला आणि मतदारांना आहवान केले.
देवेंद्र फडणवीस यांनी कुटुंबासोबत मतदानाचा हक्क बजावला. पत्नी अमृता फडणवीस आणि आईसोबत मतदान केंद्रावर दाखल झाले आणि देवेंद्र फडणवीस यांनी मतदान केले.
हेही वाचा…Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : गडकरींचे सहकुटुंब मतदान, म्हणाले ” यंदा विकास…”
मतदान झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. लोकशाहीचा उत्सव सुरु आहे. या उत्सवामध्ये मतदान हा केवळ आपला हक्क नाही. तर आपले कर्तव्य देखील आहे. म्हणून मी माझ्या कुटुंबासकट मतदानाचा हक्क बजावलेला आहे. महाराष्ट्रातील तमाम बंधू- भगिनींना मी सांगू इच्छितो की सर्वांनी मतदान करा.
मतदानाचा टक्का यावेळेला वाढेल, असे मला निश्चितपणे वाटतं. लोकसभा निवडणुकीत याद्यांमध्ये घोळ होता. यावेळी काही प्रमाणात तो कमी झालेला आहे. लोकसभेला मतदान प्रक्रिया अत्यंत हळूवार पद्धतीने सुरु होती. यावेळी सिस्टिमध्ये बदल करण्यात आला आहे. लोकसभेसारखे रणरणते ऊन यावेळी नाही. त्यामुळे लोक घराबाहेर पडून मतदान करतील, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
आज मतदान होत आहे. मात्र मतदानाच्या आदल्या दिवशी काल भाजपचे वरिष्ठ नेते, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणावर मी कालच बोललो आहे. विनोद तावडे यांनी कुठेही पेसै वाटलेले नाहीत. ना त्यांच्या जवळ पैसे मिळाले. जाणून बुजून गोंधळ निर्माण केला जात आहे.