नागपूर : येथील प्रसिद्ध टेकडी गणपती मंदिरातील मूर्ती ज्या झाडाजवळ आहे, ते झाड सुकले आहे. हे बघून भाविकांनी काळजी व्यक्त केली असून ते झाड वाचवण्यासाठी मंदिर व्यवस्थापनाने प्रयत्न करावी, अशी विनंती केली आहे. नागपुरातील सीताबर्डी टेकडी गणपती मंदिर २५० वर्षे जुने व भोसलेकालीन असल्याचे सांगण्यात येते. तेथे पिंपळाच्या झाडा शेजारी मूर्ती आहे. हे या मंदिराचे वैशिष्टआहे. परंतु मंदिर आणि परिसर सौंदर्यीकरण करताना झाडाची काळजी घेण्यात आली नाही.
हेही वाचा >>> “भाजपचे हिंदूराष्ट्र मनुस्मृतीवर आधारित!” प्रा. श्याम मानव यांची टीका, म्हणाले…
परिणामी हे इतिहासिक महत्व असलेले झाड सुकले आहे, असे संजीव तारे म्हणाले. याबाबत मंदिर व्यवस्थापनाचे माजी अध्यक्ष लखीचंद ढोबळे म्हणाले, मंदिरातील पिंपळाच्या झाडाचे ऐतिहासिक महत्व आहे. बांधकाम करताना झाडाच्या फांद्या तोडण्यात आल्या. मार्बल लावण्यात आले. याचा परिणाम झाडावर झाला असू शकतो. याबाबत अलिकडेच बैठक झाली. नीरी या संस्थेला याबाबत कळवण्यात आले. हे झाड वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. नीरीच्या प्रयत्नानंतर या झाडाला पालवी देखील आली आहे, असे ढोबळे म्हणाले.