नागपूर : राज्य पोलीस दलाच्या प्रमुख पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी १ मार्च २०२४ ला अचानक नागपुरातील संघ महाल येथील संघ मुख्यालयात पोहचल्या होत्या. त्यांनी जवळपास अर्धा तास तेथील सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली. पोलीस महासंचालकांच्या या दौऱ्याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. काँग्रेसचे नाना पटोले यांनी त्यांच्या विरोधात सर्व प्रथम नागपुरातून २४ सप्टेंबर २०२४ ला निवडणूक आयोगाला तक्रार केली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रश्मी शुक्ला १९८८ च्या तुकडीच्या आयपीएस अधिकारी असून सध्या पोलीस महासंचालक पदाबरोबरच लाचलुचपत प्रतिबंधक ब्युरोचा अतिरिक्त पदभारही त्यांच्याकडेच आहे. रश्मी शुक्ला जून २०२४ मध्ये सेवानिवृत्त होणार होत्या.पण महाराष्ट्र पोलीस कायद्याचे थेट उल्लंघन करून त्यांना महायुती सरकारने बेकायदेशीरपणे जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली. त्यांची निष्पक्षता आणि प्रामाणिकपणाबद्दल शंका घेतली जाते. रश्मी शुक्ला यांनी त्यांच्या कार्यकाळात विरोधी पक्षांच्या नेत्यांना त्रास देण्यासाठी आणि धमक्या देण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केला आहे. अनेकदा खोट्या केसेस दाखल केल्या आहेत. रश्मी शुक्ला या भाजपासाठी राजकीय प्रचारक म्हणून काम करत आहेत. त्यांनी विरोधी पक्षनेत्यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केले आहेत, त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत.

हेही वाचा…‘रेकॉर्ड’वरील गुन्हेगारांची ‘परेड’

u

एक वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणून त्यांची भूमिका पक्षपाती स्वरूपाची आहे. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या प्रभारी पोलीस महासंचालक या नात्याने त्यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना आणि सदस्यांना पोलीस स्टेशन आणि लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या कार्यालयात बोलावून धमकावले, असा आरोप कॉंग्रेसने केला होता.

तत्पूर्वी, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या यवतमाळ दौऱ्यानंतर नागपुरात पोहचल्या. पोलीस मुख्यालयाच्या शिवाजी मैदानावर सुरु असलेल्या पोलीस क्रीडा महोत्सवाच्या कार्यक्रमात त्या सहभागी झाल्या होत्या. १ मार्चला दुपारी दोन वाजता अचानक त्यांनी महालमधील संघ मुख्यालयातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्याचे नियोजन केले. याबाबत पोलीस विभागाने कमालीची गुप्तता पाळली.

हेही वाचा…विमानात बॉम्ब असल्याचे फोन, तो का करायचा ? कारण आहे धक्कादायक

शुक्ला दुपारी दोन वाजता थेट संघ मुख्यालयात पोहचल्या. बंदोबस्तात तैनात असलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आवश्यक ते निर्देश दिले. त्यांनी तेथील सीसीटीव्ही यंत्रणादेखील तपासली. संघ मुख्यालयात रश्मी शुक्ला जवळपास अर्धातास उपस्थित होत्या. त्यांनी सुरक्षा व्यवस्थेबाबत काही निर्देश दिलेत. त्यांनी परिमंडळ ३ मध्ये उपायुक्त म्हणून काम केले आहे. यामुळे त्यांच्याकडे संघ मुख्यालयाची माहिती अगोदरपासूनच होती. निवडणूक आयोगाने शुक्ला यांची बदली करण्याचे आदेश दिल्यानंतर या घटनाक्रमची चर्चा सुरू झाली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dgp rashmi shukla visited rss headquarters at nagpur nana patole complaint to election commission of india rbt 74 sud 02