यवतमाळ जिल्ह्यातील मनोज राठोड आणि नामदेव वाघमारे या दोन शेतकऱ्यांनी काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. या दोन आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबापैकी एका शेतकऱ्याच्या चारही मुलींच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी घेतली आहे. यवतमाळ दौऱ्यावर असताना कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी हे जाहीर केलं आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील मनोज राठोड व नामदेव वाघमारे या दोन शेतकऱ्यांनी काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. त्यांचे कुटुंबिय धनंजय मुंडे यांना भेटण्यासाठी यवतमाळमध्ये आले होते. धनंजय मुंडे यांच्याकडे आपली व्यथा मांडत असताना शेतकऱ्यांच्या कुटुंबातील महिलांना अश्रू अनावर झाले.

Ajit Pawar On Suresh Dhas
Ajit Pawar : “सुरेश धसांना काय वाटतं याच्याशी देणंघेणं नाही”, अजित पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “खालचे कार्यकर्ते…”
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Little boy crying a school telling teacher about fathers abuse and asking not to beat video viral on social media
“मग माझ्या बापालाच फोन करा की…”, ढसाढसा रडत शाळेतील मुलाची शिक्षिकेकडे विनवणी; VIDEO मध्ये पाहा चिमुकल्याचं नेमकं म्हणणं काय?
Abhijeet Adsul , Shivsena , Amravati, Ravi Rana ,
“महायुतीत तोंड दाबून बुक्क्यांचा मार..”, अभिजीत अडसूळ यांची राणा दाम्पत्यावर टीका
Sandeep Deshmukh Wardha district Ajit Pawar NCP group
वर्धा जिल्ह्यात सहकार गटात उभी फूट, एकाच घरी दोन झेंडे
chawl Members move into flat
‘ही शेवटची पिढी…’ चाळ सोडून जाताना घरासमोर नकळत हात जोडणारे बाबा; VIDEO पाहून मन येईल भरून
Palghar, class 10 student punished,
पालघर : पाच मिनिटांच्या उशिराकरिता ५० उठाबशा, तीन दिवसांपासून दहावीतील विद्यार्थिनी रुग्णालयात
Bharat Gogawale
Bharat Gogawale : पालकमंत्रीपदावरून डावलल्यानंतर भरत गोगावलेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जिल्ह्यातलं वातावरण…”

“शेतकरी नवरा तर गेला आता चार मुलींचा सांभाळ कसा करणार,” असा प्रश्न विचारत महिलेने हंबरडा फोडला. शासनाची मिळणारी मदतही अद्याप मिळाली नसल्याचे महिलेनं धनंजय मुंडे यांना सांगितले. तातडीने धनंजय मुंडे यांनी उपविभागीय अधिकारी अनिरुद्ध बक्षी यांना फोन लावून या दोन्ही कुटुंबांना तात्काळ अर्थसहाय्याची मदत देण्याचे निर्देश दिले.

“आत्महत्या केल्याने प्रश्न सुटत नाहीत, तर कुटुंबापुढील प्रश्न आणखी वाढतात. आपल्या कुटुंबातील व्यक्तींचा विचार करून कुठल्याही शेतकरी बांधवाने आत्महत्या करण्याचा विचार मनात आणू नये. कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास किंवा शेतकरी बांधवांना कोणतीही मदत लागल्यास आपल्या घराचे दरवाजे २४ तास उघडे आहेत,” असे भावनिक आवाहन धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांना केलं.

Story img Loader