शरद पवार आमचे ज्येष्ठ नेते आहे मात्र त्यांनी ज्या पद्धतीचे राजकारण केले आहे ते जनतेला आवडले नाही त्यामुळे आता राजकारण संपले. पावसात भिजण्याचे केवळ नाटक होते. अशा पावसात भिजल्याने सहानुभुती मिळत नाही. शरद पवार यांचे राजकारण आता संपले आहे..ते पावसात भिजले होते ते केवळ नाटक होते. त्यांनी प्रचाराच्या दरम्यान अनेक नाटके केली पण काही जमलं नाही. आघाडी ५०चा आकडा गाठू शकले नाही त्यामुळे विरोधकांचे राजकारण संपले असल्याची टीका त्यांनी केली.
हेही वाचा…चंद्रपूर : ८ लाडक्या बहिणींना मतदारांनी नाकारले, डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी…
माझा विरोधात मुलीला निवडणुकीत उतरवले असले तरी मी बाप आहे. माझा विजय हा माझा नसून तो माझ्या मतदार संघातील लोकांचा विजय आहे. मतदार संघात केलेली विकास कामे आणि जनतेचा असलेला विश्वास यामुळे मला जनतेनी पसंती दिली. आता २०२९ मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी आतापासून कामाला लागले पाहिजे. माझ्या विरोधात निवडणुका लढवणारा पुतण्या असो की मुलगी असो, त्यांना माझ्या शुभेच्छा आहे. राजकारण राजकारणाच्या जागी असल्यामुळे त्याचा परिणाम आमच्या नात्यावर होणार नाही असेही आत्राम म्हणाले.
हेही वाचा…स्वयंसेवक ते आमदार; गडचिरोलीत डॉ. मिलिंद नरोटे यांच्या विजयाने भाजपमध्ये नवचैतन्य
विशेष म्हणजे आमच्या योजना आणि कामाची पद्धत आणि अजित पवार यांनी केलेले सहकार्य बघता जो निकाल दिला आहे तो माझा मोठा विजय असल्याचे आत्राम म्हणाले. आता शरद पवार यांच्याकडे दहा शिल्लक राहिले आहे. त्यांनी चिंता करु नये.ते दहा जण आमच्यासोबत घेऊ. मात्र त्या संदर्भात कोणाशीही अजुनही बोलणे झाले नाही. पाच वर्ष आता लोकांचे काम करणे हेच आमच्यासमोरचे ध्येय असल्याचे आत्राम म्हणाले. कोण मुख्यमंत्री होईल याबाबत महायुतीचे नेते निर्णय घेतली. त्याबाबत बोलणं चुकीचे होईल पण आम्हाला वाटते राज्यात चांगले अजित पवार यांना मिळेल.