यवतमाळ: वारंवार एकच व्यक्ती गुटखा तस्करीत आढळून आल्यास ‘मोक्का’ची कारवाई करण्याचा इशारा अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेत आयोजित पत्रकार परिषदेत दिला.

औषधी, तेल, खाद्यपदार्थात भेसळ होत असल्याचे आढळून आल्यास कडक कारवाई करण्यात येईल, यात कुणीची गय केली जाणार नाही, असेही आत्राम म्हणाले. लोकांच्या कल्याणासाठी महायुतीचे सरकार राज्यात काम करीत आहे. राज्यात गुटखा बंदी असतानाही वाहतूक करून विक्री होत आहे. आतापर्यंत ५० कोटी रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला, असे आत्राम यांनी सांगितले. दुधात होणारी भेसळ रोखण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचे मीटर आले आहे. त्याचाही वापर करण्यात येणार आहे.

हेही वाचा… नापास झाल्यामुळे नैराश्य; अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

अन्न व औषध प्रशासन विभागात अधिकारी व कर्मचार्‍यांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. ही पदे लवकरच भरण्यात येणार आहे. ऑनलाईन औषध विक्रीवर बंदी टाकण्यात येणार आहे. पोलिओ मुक्तीच्या दिशेने देशाची वाटचाल सुरू आहे. आता बुस्टर डोसही देण्यात येणार आहे, अशी माहितीही आत्राम यांनी दिली.

हेही वाचा… चंद्रावर पोहोचलो तरी सोशल मीडियावर मात्र मोदींनमुळे की नेहरूंच्या दूरदृष्टीने हीच श्रेयाची लढाई

यवतमाळ, चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मजबूत करण्यात येईल. यवतमाळ जिल्ह्यात पक्षाचे संगटन मजबूत झाल्यास पुन्हा एक विधानसभा जागा वाढवून मागण्याचा मानस राहणार आहे, असेही मंत्री आत्राम यांनी स्पष्ट केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

Story img Loader