बुलढाणा पालिकेच्या प्रशासकीय राजवटीत झालेल्या विकासकामांची आमदार धीरज लिंगाडे उद्या झाडाझडती घेणार आहे! जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत आमदार लिंगाडे व मुख्याधिकारी यांची आमनेसामने बैठक होणार आहे.या बैठकीद्वारे आमदारांनी पालिकेच्या एकछत्री प्रशासक राजवटीला खुले तर त्यांना पाठबळ देणाऱ्या सत्ताधाऱ्यांना अप्रत्यक्ष आव्हानच दिल्याचे मानले जात आहे. जिल्ह्यात या पद्धतीची पहिलीच बैठक होत असून त्यातून काय ‘बाहेर’ येते व त्याचा ‘निकाल’ काय लागतो अशी उत्सुकता पालिका व राजकीय वर्तुळात निर्माण झाली आहे. यामुळे ही बैठक लक्षवेधी व वादंग निर्माण करणारी ठरली आहे.जिल्हाधिकारी यांचे दालनात १२ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता बैठक पार पडणार आहे.

यापूर्वी आ. धीरज रामभाऊ लिंगाडे यांनी ३१ मार्चला जिल्हाधिकारी एच. पी. तुम्मोड यांना पत्र पाठविले होते. शहर व्यवस्थापनाबद्दल विविध मुद्यांवर सखोल चर्चा करण्यासाठी मुख्याधिकारी तथा प्रशासक गणेश पांडे यांच्या समवेत बैठकीचे आयोजन करण्याचे त्यांनी सूचित केले होते. त्यानुसार उध्या १२ एप्रिलला सकाळी ११ वाजता बैठक लावण्यात आली आहे. बैठकीत बुलडाणा शहरातील सर्व पाइपलाइनच्या कामाचा, शहरातील पालिका शाळा क्र. २ ला लागून जी दुकाने (गाळे) बांधकामात आहेत, त्याबाबतीत विकास आराखड्यात शासनाकडून ‘मायनर मॉडिफिकेशन’ केले आहेत का?, साफसफाईचा तपशील मिळावा, पाणी पुरवठा व वितरण व्यवस्थेत सुधारणा, शहरातील बेकायदेशीर होर्डिंग या गंभीर मुद्यांवर चर्चा होणार आहे.

Municipal corporation issues notice to 28 constructions violating air pollution control regulations
वायू प्रदूषण नियंत्रण नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या २८ बांधकामांना पालिकेची नोटीस
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Tourists unaware of public holiday rules crowd in front of Veermata Jijabai Bhosale Park
सार्वजनिक सुट्टीच्या नियमाबाबत अनभिज्ञ पर्यटकांची राणीच्या बागेसमोर गर्दी
Underground sewage Scheme , Sulabha Khodke ,
अमरावती : आजी-माजी आमदारांमध्ये जुंपली… ‘हे’ आहे कारण
Two arrested in conspiracy to murder Ambernath MLA Dr Balaji Kinikar thane news
शिवसेना आमदाराच्या हत्येचा कट ? अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या हत्येचा कटात दोघे अटकेत
amravati rain news
अमरावती : थंडीची लाट…! विभागीय आयुक्तांनी काय दिला इशारा?
Mumbai municipal corporation land auction
पालिकेचे भूखंड विकासकांना नकोसे, प्रतिसाद न मिळाल्यामुळे पुनर्निविदा काढण्याची पालिकेवर नामुष्की, मलबार हिलचा भूखंड वगळणार
industry minister uday samant
हिंजवडी आयटी पार्कची कोंडी : उद्योगमंत्री उदय सामंत ‘ॲक्शन मोड’वर; अधिकाऱ्यांना दिले आदेश

हेही वाचा >>>नागपूर: संकटातील ऑर्किड्सला वाचवून आंब्यामधील जंगलात पुनःरोपण! भारतील सर्वात मोठी ऑर्किड्स पूनर्वसन मोहीम

‘सीओनी स्वतः यावे’ चे निर्देश

दरम्यान जिल्हाधिकारी यांनी बैठकी संदर्भात पाठविलेल्या पत्रात कडक निर्देश देण्यात आले आहे. मुख्याधिकारी यांना कागपत्रासह स्वतः बैठकीला उपस्थित रहाण्याची तंबी देण्यात आली आहे. प्रतिनिधी पाठवू नये, असे आदेशच जिल्हाधिकारी यांनी पांडे यांना दिले आहे. यामुळे पालिका वर्तुळ हादरले पालिका प्रशासन ‘कामाला’ लागल्याचे चित्र आहे.

Story img Loader