वर्धा : गाव खेड्यातच दिसणारे धोतर हे वस्त्र टिकून रहावे म्हणून एक अभियान सूरू झाले आहे. हे एक केवळ प्राचीन वस्त्रच नव्हे तर आधुनिक वेगवेगळ्या वस्त्र प्रकाराचा तो आधार असल्याचा दावा लतिका चावडा करतात. लतिकाज योग ही संस्था चालविणाऱ्या चावडा या एक उत्तम भाषांतरकार व संस्कृत अभ्यासक म्हणून ओळखल्या जातात. त्यांचीच धोती पहनो म्हणजेच धोतर घाला हे अभियान सूरू केले आहे. फेसबुकवर सूरू या अभियानात दर रविवारी एकाची ‘ धोती मॅन ऑफ दि वीक ‘ म्हणून निवड केल्या जात असते. त्याड केवळ भारतातूनच नव्हे तर विदेशातून प्रतिसाद मिळत आहे. प्राचीन काळी मुलं मुली दोघेही धोतर स्वरूपात वस्त्र घालत होते. कालांतराने त्याचे काष्टा किंवा नववारी साडी म्हणून प्रचलन सूरू झाले. यात सहभागी वर्ध्यातील तुषार पांडे म्हणतात की धोतर किंवा अन्य भागात मुंडू किंवा पंचा म्हणून ओळख असलेले हे वस्त्र हलके व हवेशीर आहे. कापसापासून तयार होत असल्याने दमट किंवा उष्ण वातावरणात ते अत्यंत उपयुक्त ठरते. दिल्ली येथील डॉ. राजकुमार हे म्हणतात की विविध स्वरूपात बिहार मध्ये हे धोतर घातल्या जाते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा