नागपूर: उपराजधानीत बागेश्वर धामचे धीरेंद्रकृष्ण महाराज यांच्या दिव्यशक्ती दरबारात केल्या गेलेल्या विविध चमत्कार व दाव्याचा वाद सध्या कायम आहे. त्यातच साधु वासवानी मिशन कार्यकारी अध्यक्षा दीदी कृष्णा कुमारी यांनी दिव्यशक्ती आणि भूतही असतात असा दावा नागपुरात केला आहे.
प्रेस क्लबमध्ये शनिवारी साधु वासवानी सत्संग सेंटर, नागपूरच्या वतीने २९ जानेवारीला सायंकाळी ६.१५ वाजता आयोजित सत्संग कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. थीरेंद्र कृष्ण महाराजांबाबत विचारलेल्या प्रश्नावर दीदी कृष्णा कुमारी म्हणाल्या, वेगवेगळ्या पद्धतीचे चमत्कार होऊ शकतात. चांगल्या कर्मातून जीवनही बदलू शकते. जगात दिव्यशक्ती, आत्मा व भूतही असतात. एखाद्याची इच्छा गरज पूर्ण झाली नसल्यास हा प्रकार घडतो.
हेही वाचा >>> अकोला : ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख अडचणीत; एसीबीने मागवली मालमत्तेची माहिती
धीरेंद्रकृष्ण महाराजांबाबत मी जास्त एकले वा वाचले नाही. त्यामुळे त्यांच्या दाव्याबाबत माहिती नसल्याचेही दीदी कृष्णा कुमारी यांनी सांगितले. त्यातच साधु वासवानी सत्संग सेंटर, नागपूरचे अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा म्हणाले, सिंधी भाषेमध्ये रविवारी (२९ जानेवारी) महत्मा गांधी स्कूल, जरिपटका येथील मैदानात सत्संग होणार आहे. यावेळी निरोगी व सुदृढ जगण्याबाबतचे मार्गदर्शन दीदीद्वारे केले जाईल. पत्रकार परिषदेला घनश्याम कुकरेजा, तिरथ चैधरी, मंजू रीजानी, दौलत कुंभानी उपस्थित होते.
हेही वाचा >>> संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांचे निधन
मुलांमध्ये मानसिक आजार वाढले
मुलांमध्ये मानसिक आजार वाढतांना दिसत आहे. वाढत्या आत्महत्याही त्यामागचे एक कारण आहे. हा प्रकार टाळण्यासाठी शिक्षणाची गरज असल्याचेही दीदी कृष्णा कुमारी यांनी सांगितले. परमेश्वर मंदिरातच नव्हे तर गरीबांच्या झोपडीतही आहे. त्यामुळे चांगले सेवक बसण्याची गरज असल्याची साधु वासवानी यांचे मत असून त्यादृष्टीने काम करण्याची गरजही दीदी कृष्णा कुमारी यांनी वर्तवली.