अकोला : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर मूर्तिजापूरकडे डिझेल घेऊन जाणारा टँकर उलटल्याची घटना बोरगावमंजू जवळ रविवारी घडली. टँकर उलटल्यावर त्यातून गळणारा डिझेल लुटण्यासाठी परिसरातील नागरिकांची झुंबड उडाली होती. फुकटचे डिझेल मिळवण्यासाठी नागरिकांची जीवघेणी धडपड सुरू असल्याचे विदारक चित्र अपघातस्थळी तयार झाले होते.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर अकोल्याकडून मूर्तिजापूरकडे डिझेल घेऊन जाणारा टँकर बोरगावमंजू गावाजवल उलटल्याची घटना रविवारी घडली. चालकाचे टँकरवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचे बोलल्या जाते. टँकर क्रमांक जीजे १२ झेड ८२५० हा महामार्गावर उलटल्याने वाहतुकीसाठी एक मार्ग बंद झाला. या घटनेत टँकर चालक गंभीर जखमी झाला.

Ajit Gavane statement that distribution of money is defamatory because defeat is visible
भोसरी विधानसभा: पराभव दिसत असल्याने पैसे वाटप केल्याची बदनामी – अजित गव्हाणे
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Loksatta chaturang article Free of mobile mind result Counselor
सांदीत सापडलेले…! अवधान
Jewellery worth six and half lakhs was stolen from passenger at Swargate ST station
स्वारगेट एसटी स्थानकात चोरट्यांचा उच्छाद, प्रवासी तरुणाकडील साडेसहा लाखांचे दागिने चोरीला
99 Accused from Nagpur City Tadipaar Assembly Election 2024
निवडणुकीच्या धामधुमीत ९९ आरोपी तडीपार…गेल्या १० वर्षात पहिल्यांंदाच…
ajit pawar
पिंपरी: अजित पवारांच्या पक्षाच्या देहू शहराध्यक्षाच्या मोटारीतून रोकड जप्त
ATM money theft pune, thief caught pune,
पुणे : एटीएममधून रोकड चोरणाऱ्या चोरट्याला पकडले; सुरक्षारक्षक, वाहतूक पोलिसांची तत्परता

हेही वाचा…आरोप करण्यापेक्षा नार्को टेस्टला समोरे जा, देशमुख यांना बावनकुळेंचे प्रतिउत्तर

वीर भगत सिंग आपातकालीन पथकाने टँकर चालकाला बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात पाठवले. दरम्यान, या टँकर अपघातानंतर डिझेल गळती सुरू झाली होती. अपघातग्रस्त टँकरमधून गळणारा डिझेल गोळा करण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी उसळली होती. प्लास्टिकच्या कॅन, बादल्यांमधून हे गळणारे डिझेल नागरिक गोळा करीत होते. महामार्गावरील डिझेल गळतीमुळे मोठा धोका निर्माण झाला होता.

हा धोका पत्करून परिसरातील नागरिकांची डिझेल जमा करण्याची धडपड सुरूच होती. या घटनेची माहिती मिळताच बोरगाव मंजू पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

हेही वाचा…अकरावीच्‍या विशेष फेरीची गुणवत्‍ता यादी उद्या जाहीर होणार

मालवाहतूक ट्रक वाहनाला धडकला; सहा जखमी

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर शिवर गावाजवळ मालवाहतूक ट्रक आणि चारचाकी वाहनाची धडक होऊन भीषण अपघात घडल्याची घटना रविवारी दुपारी घडली. या अपघातामध्ये सहा जण जखमी झाले आहेत.

शिवर गावाजवळ मालवाहतूक ट्रक व बेलोरो वाहनाची धडक झाली. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. दोन्ही अपघातग्रस्त वाहने रस्त्यावर आडवी पडली होती. या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. चारचाकी वाहनातील सहा जखमी प्रवाशांना उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्यात आले. महामार्गावरून अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. या अपघाताची नोंद एमआयडीसी पोलिसांनी केली आहे.

हेही वाचा…नागपूर: परीक्षेला जाताना तरुणी अपघातात ठार

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ चे चौपदरीकरण पूर्ण झाले असले तरी अपघाताचे प्रमाण कमी झालेले नाही. जिल्ह्यात या महामार्गावर सातत्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. या अपघातामुळे जीव गेले असून अनेक जण जखमी झाले आहेत. पावसाळ्याचे दिवस लक्षात घेता काळजीपूर्वक वाहन चालविण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.