लग्नपत्रिका म्हटले की महागडे कार्ड आणि आकर्षक डिझाईनची मागणी असते. प्रत्येक जण आपली लग्नपत्रिका आगळीवेगळी करण्याचा प्रयत्न करीत असतो. अशीच एक लग्नपत्रिका सध्या चंद्रपूर शहरात समाजमाध्यमातून सार्वत्रिक झाली असून, त्याची चर्चा आहे. ऐतिहासिक वारसा जपण्याचा संदेश देणारी ही लग्नपत्रिका आगळीवेगळी असली तरी लग्नसोहळ्यात चंद्रपूर शहरातील ऐतिहासिक वैभव सांगणारी प्रतिकृती देखील आकर्षक ठरणार आहे. सुनील मिलाल असे या नवरदेवाचे नाव असून, त्यांचा विवाह सोहळा शनिवार १७ डिसेंबर रोजी होत आहे.

सुनील हा ‘इको प्रो’ पर्यावरणप्रेमी संस्थेचा कार्यकर्ता असून, त्याने चंद्रपूर किल्ला स्वच्छता अभियानात सहभाग घेतला होता. यातूनच मिळालेल्या प्रेरणेतून त्याने आपल्या लग्नपत्रिकेत चंद्रपूर शहरातील सर्व ऐतिहासिक वर्षांचे जतन व्हावे, यासाठी पत्रिकेमध्ये शहरातील सर्व ऐतिहासिक स्थळांचे छायाचित्र आणि जनजागृती करणारी माहिती दिली आहे. विशेष म्हणजे, १७ डिसेंबर रोजी होणाऱ्या लग्नसोहळ्यात स्वागतासाठी चंद्रपूरच्या गोंडकालीन वैभवाचे दर्शन घडवणाऱ्या परकोटाची कोरलेली प्रतिकृती राहणार आहे.

prathamesh parab regret for not getting enough screens
“महाराष्ट्रात स्क्रिन्स मिळत नाहीयेत यापेक्षा दुर्दैव…”, प्रथमेश परबने व्यक्त केली खंत; म्हणाला, “मायबाप प्रेक्षकांपर्यंत…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Premachi Goshta Fame Actress Amruta Bane
सासरे असावेत तर असे! ‘प्रेमाची गोष्ट’ फेम अभिनेत्रीची सासरेबुवांसाठी खास पोस्ट; अभिनेता पती कमेंट करत म्हणाला…
Sharad Pawar
“राज्यात दहशतीचं वातावरण, कृपा करा अन्…”, शरद पवारांकडून मस्साजोगच्या ग्रामस्थांना धीर; म्हणाले, “आता आपण सगळ्यांनी…”
What Sunil Tatkare Said About Chhagan Bhujbal ?
Sunil Tatkare : “छगन भुजबळ यांच्याविषयी येवल्यात जाऊन कोण काय बोललं होतं ते…”; सुनील तटकरेंचं सुप्रिया सुळेंना उत्तर
amdar niwas Nagpur , Amol Mitkari Grievance ,
आमदार निवासातील गरम पाण्याचे गिझर बंद; आमदार म्हणतात, “अंघोळ करायची कशी?”
Ravi Rana amravati unhappy, Ravi Rana latest news,
Ravi Rana : रवी राणांची नाराजी कायम; अधिवेशनात उपस्थित न राहता गोसेवेत व्यस्त
Tula Shikvin Changalach Dhada promo
भुवनेश्वरीचा प्लॅन यशस्वी! सासूला खडेबोल सुनावून अक्षरा घर सोडून जाणार…; मास्तरीण बाईंना अधिपती म्हणाला…

हेही वाचा: चंद्रपूर: इतिहास काळ्या, लाल किंवा भगव्या शाईने लिहिला जात नाही; डॉ. वि. स. जोग यांचे प्रतिपादन

लोकपूर, इंदुपूर या गावापासून चांदा ते चंद्रपूर शहराच्या प्रवासात ऐतिहासिक वारसा निर्माण झाला. पुढे ब्रिटिश राजवट आणि भारतीय स्वातंत्र्यानंतर तो जतन व्हावा, यासाठी प्रयत्न झाले. आज स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतर सहकार्य करण्याची गरज आहे. चंद्रपूर शहरांमध्ये प्राचीन आणि गोंडकालीन काळातील अनेक वास्तू आजही आहेत. त्या जिवंत राहिल्या पाहिजेत, यासाठी आपला वारसा आपणच जपूया ही संकल्पना शहरातील सर्व नागरिकांमध्ये रुजवण्याची आज गरज आहे. हा संदेश नातेवाईकांच्या आणि मित्र परिवाराच्या माध्यमातून पोहोचण्याच्या दृष्टीने पत्रिकेच्या रूपाने जनजागृती करण्याचा हा प्रयत्न अनोखा आहे.

हेही वाचा: चंद्रपूर : ऐकावं ते नवलचं! माकडाचा दफनविधी, समाधीस्थळानंतर आता कृषी भवनात भजन किर्तन

ऐतिहासिक वारसा देशाचे प्रतिनिधित्व करतात, त्यांना घाण करू नका. स्मारकांना नुकसान होण्यापासून प्रतिबंधित करा, ते सर्वात मौल्यवान वास्तू आहेत. आपल्या शहरातील ऐतिहासिक स्मारके आणि स्थळ आपल्या पूर्ण शक्तीने जतन करा. ऐतिहासिक वास्तू-वारसा ही राष्ट्राची शान आणि सामर्थ्य असते, असे आवाहन या माध्यमातून होत आहे.

Story img Loader