गोंदिया: जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून अधून मधून पाऊस पडत होता. मात्र गुरुवारी सायंकाळी ४ बैलपोळा एन भरात असताना सुरू झालेला पाऊस रात्र भर बरसला आणि शुक्रवारी पहाटे पासून तर चक्क मुसळधार पावसाला सुरुवात झाली ती सकाळी ११ वाजता पर्यंत सातत्याने वाढत तर काहीशी ओसरत पाऊस सुरूच राहिला. आज बरसलेल्या मुसळधार पावसामुळे गोंदिया जिल्ह्यासह शहरात ठिकठिकाणाहून निघणाऱ्या मारबत आणि बडग्यांची मिरवणुकीच्या उत्साहावर विरजण पडले. काही अती उत्साही तरुणांनी पाऊस ओसरत नसल्याचे पाहून मारबत लाच रेनकोट घालून मिरवणूक काढली. स्वत: हातात छत्री घेऊन काही ठिकाणी औपचारिक मिरवणूक काढण्यात आली. पण त्यात उत्साह दिसून आला नाही.
ठिकठिकाण ची मिरवणूक बघण्याकरिता आजच्या दिवशी पुरुषवर्ग दुपार पर्यंत चा वेळ बाहेर घालवतात पण पहाटे पासूनच सुरु असलेल्या मुसळधार पावसाने आज घराबाहेर पडू दिले असल्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला. शुक्रवारी मध्यरात्री आणि पहाटे पासूनच सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरात ठिकठिकाणी पाऊसाचे पाणी साचलेले होते. गोंदिया शहरातून वाहणारी पांगोली नदी दुथडी भरुन वाहत असल्यामुळे गोंदिया आमगाव मार्ग बंद करण्यात आले आहे. नदीवरील पाणी ओसरल्यानंतर मार्ग पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचे सहायक आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे यांनी बोलताना सांगितले.