अकोला : केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत महिला बचत गटातील सदस्यांना व्यवसायाची संधी व ‘डिजिटल’ व्यवहाराचे कौशल्य विकसित करण्यासाठी विशेष प्रशिक्षण दिले जात आहे. प्रशिक्षणाच्या माध्यमातून सदस्यांना ‘डिजिटल सहेली’ म्हणून तयार केले जाणार आहे. केंद्र शासनाचा विशेष उपक्रम राबविण्यासाठी राज्यातील पाच शहरांची पथदर्शी प्रकल्प म्हणून निवड करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘डिजिटल’ व्यवहार हे अनेक महिलांसाठी नवीन आहेत. नोटाबंदीनंतर देशातील प्रत्येक व्यक्तीला ‘डिजिटल’ व्यवहारांचे वेगवेगळे मार्ग वापरण्याची गरज पडली. बहुतांश आर्थिक व्यवहार आता डिजिटल माध्यमातून केले जातात. आर्थिक व्यवहारांसाठी एक जलद आणि सोयीस्कर मार्ग ठरत आहे. यातून विविध व्यवसाय देखील केले जाऊ शकतात. ‘डिजिटल’ व्यवहारात बचत गटाच्या महिलांना प्रशिक्षित करण्यासाठी केंद्र शासन विशेष उपक्रम राबवित आहे.

हेही वाचा – गडकरींविरुद्ध महाविकास आघाडीचा उमेदवार कोण?

या उपक्रमात राज्यातील बृन्हमुंबई, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती व अकोला या पाच महानगरपालिकांचा समावेश करण्यात आला. प्रशिक्षणात बचत गटातील महिलांना ‘डिजिटल’ वित्तीय साक्षरता, ‘बँकींग सेवा’, प्रवास, विमा सहाय्य, ‘बिल पेमेंट’, ‘टेलिमेडिसिन’ सेवा आणि इतर सेवा संदर्भातील कौशल्य देण्यात येत आहेत. नागरी भागातील महिलांचे सक्षमीकरण, गरिबी कमी करणे व त्यासाठी उपजिविकेच्या संधीमध्ये वाढ करणे आदी उपक्रमांचे उद्देश आहेत.

हेही वाचा – विदेशी पर्यटकांचे जंगल भ्रमण महागणार, काय आहेत कारणे?

अकोला महापालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक कविता द्विवेदी यांच्या आदेशान्वये महानगरपालिकेच्या मुख्य सभागृहात बचत गटांच्या महिलांच्या प्रशिक्षणास प्रारंभ झाला. प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये एकूण १५० सदस्यांनी प्रशिक्षण घेतले. यासाठी छत्रपती संभाजीनगर येथून प्रशिक्षक राहुल भगत उपस्थित होते. या पथदर्शी कार्यक्रमात महाराष्ट्र राज्यातील एक हजार महिलांना ‘डिजिटल’ साधनांचा वापर व व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. यामध्ये अकोला शहरातील १५० महिलांची निवड करण्यात आली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Digital saheli know the features of the pilot project ppd 88 ssb
Show comments