नागपूर : इतवारी (नागपूर) ते छिंदवाडा रेल्वे मार्गावरील पूल पावसामुळे खचला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद गेल्या पाच महिन्यांपासून बंद आहे. या पुलाचे काम मे २०२५ पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती दक्षिण-पूर्व मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक दीपक गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इतवारी-छिंदवाडा रेल्वे ब्रॉडगेजचे काम पूर्ण करून फेब्रुवारी २०२१ ला या मार्गावर रेल्वेगाडी सुरु करण्यात आली होती. पावसामुळे या मार्गावरील भंडारकुंड-भिमालगोंडी दरम्यानच्या रेल्वे पुलास तडे गेले. ही घटना ऑगस्ट २०२४ घडली आणि एकच खळबळ उडाली. कारण, केवळ साडेतीन वर्षांत पूल क्षतिग्रस्त झाला. त्यामुळे या मार्गावरील तीन पॅसेंजर गाड्या रद्द करण्यात आल्या.  इतवारी-शाहडोल एक्स्प्रेसचा मार्गात बदल करण्यात आला आहे. ही गाडी आमला मार्ग सुरू आहे. आता या रेल्वे पुलाचे मे २०२५ पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावर लवकरच गाड्या पूर्ववत होणार आहेत.

इतवारी -छिंदवाडा १४९.५२२ कि.मी. रेल्वेमार्गाच्या ब्रॉडगेजचे काम २०२१ पूर्ण झाले. या प्रकल्पावर एकूण ५८५ कोटी ९३ लाख रुपयांचा खर्च झाला. या मार्गावर २६ मोठे आणि २५० छोटे पूल आहेत. यापैकी २१ मोठय़ा आणि ५० छोटय़ा पुलांचे काम झाले आहे. या मार्गावरील केवळ सौंसर, रामाकोना आणि विमलगुडा रेल्वे स्थानक आहेत.   

इतवारी ते नागभीड मार्ग

इतवारी ते नागभीड ११० किलोमीटर रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे. इतवारी ते उमरेड दरम्यानचे ५५ किलोमीटर मार्गाचे जवळपास पूर्ण असून तो जून २०२५ पर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. तर उमरेड ते नागपूर या रेल्वे मार्गाचे काम ऑक्टोबर २०२५ पर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती दक्षिण-पूर्व मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक दीपक गुप्ता यांनी दिली.

इतवारी ते नागभीड हा १०६.२ किलोमीटर रेल्वेमार्ग प्रकल्प साकारला जात आहे. महारेल हे काम करीत आहे. 

इतवारी ते उमरेड रेल्वेमार्गाचे काम येत्या जून पर्यंत आणि उमरेड ते नागभीड रेल्वेच्या मार्गाचे काम ऑक्टोबर २०२५ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.

 नागपूर ते उमरेडपर्यंतचे काम अंतिम टप्प्यात आहे. तर उमरेड ते नागभीड मार्गाचे काम सुरू आहे. उमरेडजवळ गतिशक्ती योजनेअंतर्गत गुड्स टर्मिनल विकसित करण्यात येत आहे. हा मालधक्का वेस्टर्न कोलफिल्ड लि.चा राहणार आहे.