वर्धा : उन्हाळा म्हणजे मुलांसाठी सुट्ट्यांचा आनंद. परीक्षा आटोपली की सुट्ट्या केव्हा लागणार याची मुलं आतूरतेने वाट बघत असतात. तर मुलांनो, यावर्षी दोन मे पासून सुट्टी सुरू होणार आहे. ती अकरा जूनपर्यंत राहणार असून, पुढील शैक्षणिक सत्र बारा जूनपासून सुरू होईल. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालकांनी हे जाहीर केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – नागपूर : आंघोळ करणाऱ्या महिलेची काढली अश्लील चित्रफित

हेही वाचा – नागपूर : आंघोळ करणाऱ्या महिलेची काढली अश्लील चित्रफित

विदर्भातील उन्हाळ्याचा कालावधी लक्षात ठेवून पुढील सत्र सव्वीस जूनपासून सुरू होणार आहे. नववीपर्यंतचा, तसेच अकरावीचा निकाल तीस एप्रिलपर्यंत देणे अपेक्षित आहे. त्यानंतर सुद्धा लावता येईल. पण निकाल विद्यार्थी किंवा पालकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी शाळेची असेल. उन्हाळी, दिवाळी, नाताळ किंवा अन्य सुट्ट्या ७६ दिवसांपेक्षा अधिक असू नये, असे निर्देश आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Director of secondary and higher secondary education announced the information about when summer vacations will start pmd 64 ssb