चंद्रपूर : बाजार समिती निवडणूक निकालानंतर काँग्रेस पक्षात घमासान सुरू झाले आहे. काँग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार बाळू धानोरकर यांनी थेट माजी मंत्री आमदार विजय वडेट्टीवार यांना चंद्रपूर लोकसभा निवडणूक लढण्याचे आवाहन देत, अन्यथा मी ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणूक लढतो व जिंकून दाखवतो, असे म्हटले आहे. तर माजी मंत्री वडेट्टीवार यांनी धानोरकर यांच्यासमोर लहान नेते आहोत, असे म्हटले आहे.

जिल्ह्यात नुकत्याच १२ बाजार समित्यांच्या निवडणुका पार पडल्या. यातील चंद्रपूर बाजार समितीत काँग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवार व भाजपा नेते पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार युतीने विजय मिळविला. या विजयानंतर भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे व काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी एकत्र येत गुलाल उधळीत ढोल ताशांच्या तालावर भांगडा केला. या डान्सची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू आहे.

inflation rate declined
किरकोळ महागाई दराची उसंत, नोव्हेंबरमध्ये ५.४८ टक्क्यांवर घसरण
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
indian stock market nifty sensex
अमेरिकी महागाई दराच्या प्रतीक्षेत निर्देशांकात नगण्य वाढ
Ration Distribution delayed due to technical difficulties Nagpur news
 ‘सर्व्हर डाऊन’ ! राज्यात स्वस्त धान्य वाटप रखडले…
equity funds investment declined
इक्विटी फंडांतील ओघ ओसरला! नोव्हेंबरमध्ये १४ टक्क्यांनी घटून ३५,९४३ कोटींवर
Satara , development work Satara, code of conduct Satara, Satara latest news,
आचारसंहिता संपल्याने साताऱ्यात दीडशे कोटींच्या विकासकामांना प्रारंभ
sunk deposits loksatta news
विश्लेषण : बुडालेल्या ठेवी परत मिळू शकतात? शासनाचे नवे परिपत्रक काय?
loksatta readers response loksatta news
लोकमानस : सत्यकथनासाठी निवृत्तीचा मुहूर्त

हेही वाचा – नागपूर: लग्नाचे आमिष दाखवून बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले; तरुणी गर्भवती होताच…

स्वपक्षीय खासदाराच्या प्रभावाने वडेट्टीवार समर्थक काँग्रेस अध्यक्ष देवतळे यांनी एक प्रकारे धानोरकर यांना आवाहन दिले आहे. त्यामुळे धानोरकर चांगलेच संतापले. विशेष म्हणजे, या निकालानंतर वडेट्टीवार समर्थकांचे म्हणणे आहे की, खासदार असल्याने चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील पराभवाची जबाबदारी क्षेत्राचे खासदार या नात्याने धानोरकरांनी घ्यावी.

धानोरकर यांनी त्यांच्या मतदारसंघात पूर्ण बहुमताने विजयी व्हायला हवे होते, एव्हढेच नाही तर त्यांच्या विधानसभा क्षेत्रातील बाजार समितीवर निर्विवाद यश मिळायला हवे होते मात्र तसे होऊ शकले नाही. यावर विचारमंथन होण्याची गरज आहे. एव्हढेच नाही तर चंद्रपूर बाजार समितीच्या निकालानंतर काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे व भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी एकत्र येऊन मोठा जल्लोष केला होता.

दोन्ही पक्षांच्या जिल्हाध्यक्षांची केलेला हा जल्लोष काँग्रेस पक्षातील अंतर्गत मतभेद दाखविणारा आहे. वडेट्टीवार यांच्या समर्थकांच्या वक्तव्यावर खासदार धानोरकर म्हणाले की, बाजार समितीच्या निवडणुका स्थानिक पातळीवर होतात. स्थानिक समीकरणे निर्माण करून विजय मिळवला जातो. त्याचा राजकीय पक्षांशी काहीही संबंध नाही. वडेट्टीवार यांचे समर्थक निवडणूक निकालांबाबत अशी विधाने करत आहेत, त्यामुळे ते योग्य नाही. कोणतीही निवडणूक लढवण्यास ते पूर्णपणे सक्षम आहेत. त्यांची इच्छा असेल तर ते येथे येऊन लोकसभा निवडणूक लढवू शकतात, अन्यथा मी त्यांच्या ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढवून जिंकून दाखवतो, असेही धानोरकर म्हणाले.

हेही वाचा – यवतमाळ : ‘माता न तू वैरिणी’; मुलाच्या हत्येची चक्क आईनेच दिली सुपारी

विशेष म्हणजे धानोरकर यांनी वडेट्टीवार यांच्यासोबत मतभेद नाही असेही म्हटले आहे. यावर माध्यमांशी बोलताना माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी, धानोरकर काँग्रेस पक्षाचे मोठे नेते आहेत. त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर आमदार आहेत. काँग्रेस पक्षाचे खासदार आमदार असल्याने त्यांच्यावर टीका करण्याचा प्रश्न नाही. आम्ही त्यांच्यापुढे टिकू शकत नाही. त्यामुळे आम्ही आव्हान स्वीकारू शकत नाही. त्यांच्या आगामी निवडणुकांमध्ये त्यांना भरभरून यश मिळो, अशीच आमची प्रार्थना आहे.

वडेट्टीवार व धानोरकर यांच्यातील वादामुळे काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते चांगलेच अस्वस्थ झाले आहेत. विशेष म्हणजे २८ एप्रिल रोजी चंद्रपूर शहर काँग्रेसच्या वतीने नेहरू शाळेत आयोजित ईद मिलन कार्यक्रमात माजी मंत्री वडेट्टीवार व खासदार धानोरकर दोघेही सहभागी झाले होते. परंतु दोन्ही नेत्यांनी कार्यक्रमात एकमेकांची गाठभेट होणार नाही, अशा वेळेची निवड केली होती.

Story img Loader