चंद्रपूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला चंद्रपूर जिल्ह्यात विशेष प्रतिसाद मिळत नाहीये. अजित पवार गटाचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी शनिवारी जिल्ह्यात बैठक घेतली. यात अजित पवार यांच्यासोबत किती पदाधिकारी येऊ शकतात, याचा आढावा घेतला. मात्र त्यांच्या पदरी निराशाच पडली. या बैठकीला ॲड. बाबासाहेब वासाडे व सुनील दहेगावकर वगळता इतर कोणत्याही प्रमुख पदाधिकाऱ्याने हजेरी लावली नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

बैठकीला जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष, तहसील अध्यक्ष, महिला जिल्हाध्यक्षा व इतर सर्व सेलचे पदाधिकारी उपस्थित नव्हते. सध्याच्या परिस्थितीत शरद पवार यांच्यासोबत असलेल्या जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना अजित पवार गटात जायचे नाही, असे यावरून स्पष्ट झाले, असे बोलले जात आहे.

हेही वाचा – एटीएमकार्डची अदलाबदल करून फसवणूक, बिहारी टोळीला मध्यप्रदेशातून अटक

हेही वाचा – शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन केल्यास २०० रुपये दंड, नागपुरात कारवाई सुरू, राज्यात लवकरच अंमलबजावणी

विशेष म्हणजे, गेल्या ४५ वर्षांपासून शरद पवारांशी जुळलेल्या ॲड. वासाडे यांनी अजित पवार गटाच्या बैठकीला हजेरी लावल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सुनील दहेगावकर यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस सोडून चंद्रशेखर राव यांच्या (केसीआर) भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश केला होता, आता ते अजित पवारांच्या गोटात दिसू लागले आहेत.