नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील सात प्राध्यापकांची आर्थिक फसवणूक प्रकरणातील आरोपी जनसंवाद विभागाचे प्राध्यापक डॉ. धर्मेश धवनकर यांच्याविरोधात सुरू असलेला विभागीय चौकशी समितीचा तपास अंतिम टप्प्यात असताना सातपैकी चार तक्रारकर्त्यांनी माघार घेतली. ज्यांनी धवनकर यांना पैसे दिल्याचे मान्य केले होते त्यांनीच माघार घेतल्याने या प्रकरणाला नवे वळण आले आहे. शिवाय त्यांच्या तक्रारीच्या आधारावर दहा महिन्यांपासून विद्यापीठाने चौकशी केली, धवनकर यांना सक्तीच्या रजेवर पाठवून त्यांना वर्षभर वेतन दिले. असे असताना ऐन वेळेवर तक्रार मागे घेतल्याने धवनकर यांना देण्यात आलेले वर्षभराचे वेतन या तक्रारकर्त्यांकडूनच वसूल करावे असा सूर विद्यापीठ वर्तुळात आहे. तसेच धवनकर प्रकरणात मध्यस्थी करण्यासाठी विद्यापीठाचे एक निवृत्त अधिकारी व एका विभागातील प्राध्यापकाचा समावेश असल्याची चर्चाही रंगली आहे. 

सात उच्चपदस्थ विभागप्रमुखांकडून लैंगिक छळाच्या बनावट तक्रारीची भीती दाखवून लाखो रुपयांची खंडणी वसूल केल्याचा आरोप असलेल्या डॉ. धवनकर यांच्या पराक्रमाने संपूर्ण शैक्षणिक क्षेत्राला हादरवून सोडले होते. हे सात प्राध्यापक धवनकर यांच्या जाळ्यात कसे सापडले, त्यांच्यावर कुठला दबाव होता, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. धवनकर प्रकरणाच्या प्राथमिक चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या निवृत्त न्यायाधीश अजय चिंतामण चाफले यांच्या समितीने आपला अहवाल कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांना सोपवला होता. चाफले यांनी सातही तक्रारकर्त्यांना बोलावून त्यांचा जबाब नोंदवला. तक्रारकर्ते शेवटपर्यंत आपल्या तक्रारीवर ठाम होते. त्यांनी धवनकर यांनी कशी फसवणूक केली याची संपूर्ण माहिती दिली. प्राथमिक चौकशी समितीने धवनकर यांची विभागीय चौकशी करावी अशी शिफारसही केली. त्यामुळे निवृत्त जिल्हा न्यायाधीश समीर दास यांच्या समितीने धवनकर प्रकरणाची चौकशी केली. समितीचे काम अंतिम टप्प्यात आल्याची माहिती आहे. मात्र, या संपूर्ण प्रकरणाला आता नवे वळण आले आहे. सात तक्रारकर्त्यांमधून एक प्राध्यापक विभागीय चौकशीला आलेच नाही. दोन तक्रारकर्त्यांना केवळ धमकावले होते परंतु त्यांनी पैसे दिले नाही.

Deportation of 101 criminals within Maval Vidhan Sabha Constituency Police Station limits Pune news
मावळचे वातावरण तापले! तालुक्यातून १०१ गुन्हेगार हद्दपार
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
husband of former BJP corporator, kidnapping,
पिंपरी : अपहरण, मारहाण प्रकरणी भाजपच्या माजी नगरसेविकेचा पती, माजी स्वीकृत सदस्यासह ११ जणांवर गुन्हा
Jewellery worth six and half lakhs was stolen from passenger at Swargate ST station
स्वारगेट एसटी स्थानकात चोरट्यांचा उच्छाद, प्रवासी तरुणाकडील साडेसहा लाखांचे दागिने चोरीला
Congress, votes, Nayab Singh Saini, Nayab Singh Saini pune,
खोटी आश्वासने देऊन मतविभागणीचा काँग्रेसचा उद्योग, हरियाणाचे मुख्यमंत्री नायबसिंग सैनी यांचा आरोप
Municipal corporation Thane, illegal hoarding holders Thane, illegal hoarding Thane,
ठाण्यात ५२ बेकायदा होर्डिंगधारकांना पालिकेच्या नोटीसा, १० कोटी ९६ लाखांचा दंड पालिका करणार वसूल
Eknath Shinde, Eknath Shinde news, Jitendra Awhad latest news,
ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या नावाने करोडोंची वसुली, आमदार जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप
sexual harassment crime victim, compensation,
लैंगिक छळाच्या गुन्ह्यात पीडितेला नुकसान भरपाईचा आदेश देणे अपेक्षित…

हेही वाचा >>>‘जग्गू डॉन’ने शेतकऱ्यांना फसवून खरेदी केली कोट्यवधीची मालमत्ता; फ्लॅट, दुकान, शेतीची खरेदी अन्…

मात्र, ज्या चार प्राध्यापकांची फसवणूक होऊन त्यांनी पैसे दिल्याची तक्रार केली होती त्यांनीच दोन्ही पक्षांमध्ये सहमतीने माघार घेत असल्याचे कबूल केले. असेच आता कुठलेही आर्थिक देणे-घेणे नाही असेही लिहून दिले. त्यामुळे या प्रकरणाला नवे वळण आले आहे. तक्रार मागे घेणाऱ्या या चार प्राध्यापकांची फसवणूक झाल्यामुळे विद्यापीठाने धवनकर यांना सक्तीच्या रजेवर पाठवले. तसेच प्राथमिक व विभागीय चौकशीही लावली. मात्र, आता त्यांनीच माघार घेतल्याने या प्राध्यापकांचीच चौकशी करावी व त्यांच्याकडून धवनकर यांना देण्यात आलेले वेतनाचे पैसे वसूल करावे असाही सूर विद्यापीठ वर्तुळात आहे.