नागपूर : भाजपच्या हातून हरियाणा राज्य जाणार अशीच चर्चा तेथील विधानसभा निवडणुकीपूर्वी होती, माध्यमांनी केलेल्या निवडणूक पूर्व सर्वेक्षणाचे कलही हेच संकेत देणारे होते. सकाळी मतमोजणीचे कल येणे सुरू झाल्यावरही कल कॉंग्रेसच्या बाजूचेच होते अन काही वेळाने चित्र पालटले, भाजपने निर्णायक आघाडी घेत काँग्रेसला मागे टाकले आणि बहुमताचा आकडा पार केला. अपेक्षेप्रमाणे भाजपने हरियाणा काबिज केले. न निवडणुकीतील विजय साजरा करण्याची भारतीय जनता पक्षाच्या पद्धती प्रमाणे जल्लोष देशभर जल्लोष झाला. दिल्लीतील पक्षाच्या  मुख्यालयात मोदींच्या उपस्थितीत विजयी सभाही पार पडली. पण एक गोष्ट त्यात खटकणारी ठरली. हरियाणात प्राचाराला गेलेले गडकरी व्यासपीठावर अनुपस्थित होते.

भारतीय जनता पक्षाने केंद्रात सलग तिसऱ्यांदा सत्ता स्थापन केली. यावेळी भाजपला बहुमताचा आकडा पार करता आला नाही, दुसरीकडे काँग्रेसने लोकसभेच्या संख्याबळाची शंभरी पार केली. यावरून भाजपचा जनाधार कमी होत चालला, अशी टीका विरोधकांनी सुरू केली. त्यांचे लक्ष्य हे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्री अमित शहा हेच होते. महाराष्ट्रातही भाजपला जबर फटका बसला. या निवडणुकीनंतर लगेच हरियाणा आणि जम्मू काश्मिर विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या. नेहमीप्रमाणे भाजपने यात संपूर्ण ताकद झोकून दिली.  मात्र जनमत भाजपच्या विरोधात असल्याचेच चित्र या प्रदेशात निवडणूक काळात दिसून येत होते. काँग्रेस यावेळी या राज्यात मुसंडी मारणार असे राजकीय विश्लेषक सांगत होते. निवडणूक पूर्व सर्वेक्षणाचे कलही हीच बाब अधोरेखित करीत होते. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात उत्साह होता व भाजपकडून सावधपणे पावले उचलली जात होती. निवडणुकीचे निकाल मात्र भाजपच्याबाजूने  लागले आणि काँग्रेसला धक्का बसला. निकाल जाहीर होताच भाजपमध्ये उत्साहाला उधाण आले. देशात सर्वत्र पक्ष कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला. दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत विजयी सभा पार पडली. प्रथेप्रमाणे विजयी सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांच्यासह गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, पक्षाचे अध्यक्ष ज.पी. नड्डा यांच्यासह संबधित राज्याचे पक्षाचे प्रभारी उपस्थित राहतात.हे सर्व नेते यावेळी होते. पण बहुतेक वेळा या संभांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही उपस्थित राहिले आहे. यावेळी गडकरी यांनी हरियाणात अनेक प्रचार सभा घेतल्या होत्या. ते मंगळवारी दिल्लीतही उपस्थित होते. त्यामुळे विजयी सभेत त्यांची उपस्थिती अपेक्षित होती. पण ते व्यासपीठावर न दिसल्याने तर्क वितर्कांना सुरूवात झाली आहे.

sachin pilot
धार्मिक मुद्द्यावर बोलणाऱ्या भाजपला ‘पढोगे तो बढोगे’ हे सांगण्याची वेळ; सचिन पायलट यांची टीका
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
MVA allegation is that money is being distributed to the police by BJP Pune news
भाजपकडून पाेलीस बंदाेबस्तात पैशांचे वाटप? ‘मविआ’चा आरोप, महायुतीचेही प्रत्युत्तर..
Priyanka Gandhi statement regarding those who show BJP flags during road shows
रोड-शो दरम्यान भाजपचे झेंडे दाखवणाऱ्यांना प्रियंका गांधी म्हणाल्या, तुम्हाला शुभेच्छा मात्र…
Sanju Samson meets Female Fan After Match Who Injured by His Massive Six Watch Video IND vs SA
संजू सॅमसनच्या ‘त्या’ कृतीने जिंकली चाहत्यांची मनं, षटकारामुळे घायाळ झालेल्या चाहतीची घेतली भेट अन्…, पाहा VIDEO
Katol, Saoner, salil Deshmukh, Ashish deshmukh,
विरोधकांचे दोन मतदारसंघ भाजपच्या निशाण्यावर; काटोल, सावनेरची लढत प्रतिष्ठेची
pune bjp fight
पुणे: प्रचार फेरीत भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, संगमवाडीतील घटना