भंडारा : लोकसभा निवडणुकीचे वातावरण आता चांगलेच तापले आहे. महायुती आणि महाविकास आघाडीने विविध मतदार संघात उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यास सुरुवात केली आहे. मात्र भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघात कोणत्याही पक्षाने आपल्या उमेदवाराची अधिकृत घोषणा अद्यापही केलेली नाही. त्यामुळे “लोकसभेचा उमेदवार कोण” या एकाच विषयावर सर्वत्र चर्चा होत आहे. सोशल मीडियावर तर दररोज नवनवीन नावांची घोषणा होत आहे. सध्या उमेदवारांच्या नावांची वेगवेगळी यादी दिवसागणिक समोर येत असून प्रत्येक जण “हाच अधिकृत उमेदवार” असे जणू जाहीरच करीत आहेत. त्यामुळे “उमेदवार कोण” या एकाच प्रश्नाभोवती सध्या या मतदार संघात चर्चा आहे. दुसरीकडे इच्छुकांचा जीव मात्र टांगणीला लागला आहे.

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघ आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला तर युतीत भाजपाकडे हे जवळपास निश्चित असताना युतीत राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल मधेच डोके वर काढून आमचाच उमेदवार असणार असा दावा करीत भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या काळजाचे ठोके वाढविण्याचे काम करीत आहे. आघाडीत सुध्दा हेच चालले आहे. काँग्रेसच्या इच्छुकांना डावलून इतरच नावांच्या चर्चांना उधाण आले आहे त्यामुळे काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांची धाकधूक सुध्दा वाढली आहे.

Hindra Thakur Vasai program, Hindra Thakur,
वसई : ‘आमने सामने’ कार्यक्रमात ठाकुरांचेच वर्चस्व, हितेंद्र ठाकुरांसमोर विरोधक फिरकलेच नाहीत
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
North Nagpur, Atul Khobragade, Employee Pension,
या अपक्ष उमेदवाराला निवडणुकीसाठी अनेक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी दिली एक महिन्याची पेन्शन
Tuljapur Devanand Rochkari, Tuljapur, Dheeraj Patil,
तुळजापुरात मैत्रीपूर्ण लढत की, आघाडीत बिघाडी? मविआचा अधिकृत उमेदवार कोण? रोचकरी की, पाटील?
Nitin Gadkari Umarkhed, Nitin Gadkari Kisan Wankhade,
“काँग्रेसने जातीयवाद आणि सांप्रदायिकतेच विष कालवले,” नितीन गडकरी यांची यवतमाळात टीका
Kishore Jorgewar expressed his displeasure with Sudhir Mungantiwar front of Devendra Fadnavis
थेट फडणवीसांसमोरच जोरगेवारांनी व्यक्त केली मुनगंटीवारांवर जाहीर नाराजी… म्हणाले, “मला उमेदवारी मिळू नये म्हणून…”
devendra fadnavis, public rally, nagpur west assembly constituency
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आम्ही पाकिस्तानमधून उमेदवार…”
Marathwada assembly election 2024
मराठवाड्यात शिक्षकांकडून संस्थाचालकांचा प्रचार !

हेही वाचा…अकोल्यात भाजपच्या उमेदवारीत धक्कातंत्र ?

मागील अनेक दिवस भाजपचे विद्यमान खासदार सुनील मेंढे आणि माजी मंत्री परिणय फुके यांच्या नावांची जोरदार चर्चा असताना प्रफुल्ल पटेलांनी राष्ट्रवादीचा उमेदवार देणार अशी पुडी सोडल्याने युतीत पुन्हा ट्विस्ट आले आहे. त्यातच विजय शिवणकर यांच्या नावाची चर्चाही रंगू लागली आहे. त्यामुळे युतीत “दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ” तर होणार नाही अशाही चर्चांना ऊत आलेला आहे. तिकडे आघाडीत काही दिवसांपूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, डॉ. निंबार्ते आणि काँगेस जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई या तीन नावांची यादी निवडणूक आयोगाकडे पाठविल्याची हवा पसरविली गेली असताना आता माजी आमदार चरण वाघमारे आणि डॉ. प्रशांत पडोळे यांची नावे प्रकाश झोतात येत आहेत. त्यामुळे युती आणि आघाडीत ज्यांच्या हाती अधिकृत उमेदवारांचे पत्ते आहेत असे भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मनात नेमके काय चालले आहे हे समजणे केवळ अशक्य झाले आहे.

कालपर्यंत आपल्यालाच उमेदवारी मिळणार असे छातीठोकपणे सांगणारे उमेदवारही आता हिरमुसल्या चेहऱ्याने मतदार संघात फिरताना दिसत आहेत. त्यात प्रत्येक जण त्यांना ” तिकीट मिळणार का? ” असे प्रश्न विचारून भांबावून सोडत आहेत. अशातच महिला उमेदवार म्हणून शुभांगी मेंढे, जयश्री बोरकर आणि डॉ. विजया नंदुरकर ही नावेही सध्या चर्चेत आली आहेत. यामुळे या मतदार संघात उमेदवारी नेमकी कुणाला मिळेल याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. लवकरात लवकर उमेदवारी घोषित करून प्रचाराला जास्तीत जास्त वेळ मिळावा असेही इच्छुक उमेदवाराना वाटू लागले आहे.

हेही वाचा…उमेदवाराचा पत्ता नाही, पण ‘प्रचार’ सभांना जोर! यवतमाळ, वाशिममध्ये आता उद्धव ठाकरेंची सभा

भंडारा गोंदिया मतदार संघात भाजप आणि काँग्रेस या दोनही पक्षात अनेकजण इच्छूक आहेत. प्रत्येकांनी आपल्या पद्धतीने तिकीट मिळविण्याचा प्रयत्न चालविला आहे. काही जण दिल्लीत तर काही जण मुंबईत तळ ठोकून आहेत. कुणीही ठामपणे आपल्याला उमेदवारी मिळेल हे सांगत नाही. परिणामी उमेदवार कोण याचीच चर्चा सर्वत्र दिसत आहे. सोशल मिडिया यात अग्रेसर आहे. व्हॉटसअॅप आणि फेसबुकवर पोस्टचा महापूर आला आहे. प्रत्येकजण गणित लावून संबंधितालाच कशी उमेदवारी मिळणार हे सांगत आहे. दोन दिवसांपासून तर काही उमेदवारांची नावे व्हॉटस ॲपवरून उमेदवारी निश्चित झाली म्हणून फिरत आहे. मात्र त्यात कोणताही अधिकृतपणा दिसत नाही. गावागावातील चर्चातही राजकारण हाच विषय असून कोणाला उमेदवारी मिळणार हे चविष्टपणे चर्चिले जात आहे. सोशल मीडिया वर कोणता उमेदवार कसा प्रभावी राहील हे सांगितले जात आहे. जातीचे गणित मांडून यालाच तिकीट मिळेल, असेही अनेकजण सांगत आहे. मात्र जोपर्यंत पक्ष अधिकृत उमेदवारांची घोषणा करत नाही तोपर्यंत अशा चर्चा मतदारसंघात व्हायरलच होणारच !!

हेही वाचा…वाशिम : महायुतीकडून चंद्रकांत ठाकरे ? बॅनरमुळे चर्चेला उधाण !

उमेदवारीसाठी जातीय समीकरण

भंडारा-गोंदिया मतदार संघात उमेदवारीसाठी जातीय समीकरणावर चर्चा होत आहे. या मतदार संघात कुणबी, पोवार, तेली समाजाचे प्राबल्य आहे. त्यामुळे या समाजातून उमेदवारी कोणता पक्ष देणार यावरही सोशल मीडियात चर्चा होत आहे.