अकोला : पश्चिम विदर्भात विविध जिल्ह्यांतील सोयाबीन पिकाला मूळकुजचा धोका निर्माण झाला आहे. काही ठिकाणी प्रादुर्भाव आढळला. सध्या बुरशीला पोषक वातावरण तयार झाले. या रोगावर वेळीच उपाययोजना करण्याचा सल्ला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने दिला आहे.

सोयाबीन पीक काही ठिकाणी फुलोरा व शेंगा लागण्याच्या अवस्थेमध्ये आहे. पीक साधारणत: ५० ते ६० दिवसांपर्यंत आहे. या पीक वाढीच्या कालावधीत पिकाला सर्वात जास्त अन्नपुरवठा आवश्यक असतो. मागील वर्षी ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मूळकुज रोगाचा प्रादुर्भाव चांदूरबाजार, अचलपूर, रिसोड, मोर्शी आदी भागांमध्ये आढळला होता.

Prices will increase due to reduced arrival of chillies Nandurbar news
यंदा लाल तिखटाचा भडका उडणार; मिरचीची आवक घटल्याने दर वाढणार
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
Needle Free Shock Syringes for painless medical treatments
वेदनाविरहित वैद्यकीय उपचारासाठी सुई विरहित शॉक सिरिंज; आयआयटी मुंबईचे संशोधन
Municipal corporation issues notice to 28 constructions violating air pollution control regulations
वायू प्रदूषण नियंत्रण नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या २८ बांधकामांना पालिकेची नोटीस
Manghar Transformation into India First Honey Village in crisis
महाबळेश्वरमधील ‘मांघर’च्या मधमाश्यांवर संकट
Distribution of fake inheritance certificates by court clerk navi Mumbai news
न्यायालयातल्या लिपिकाकडून बनावट वारस दाखल्यांचे वाटप;  पनवेल येथील न्यायालयातील प्रकार, लिपिक अटकेत
Mumbai municipal corporation land auction
पालिकेचे भूखंड विकासकांना नकोसे, प्रतिसाद न मिळाल्यामुळे पुनर्निविदा काढण्याची पालिकेवर नामुष्की, मलबार हिलचा भूखंड वगळणार
Sessions Judge of Kalyan District accused threw slippers on judge
कल्याण न्यायालयात आरोपीने, न्यायाधिशांचे दिशेने चप्पल भिरकावली

हेही वाचा – बाप रे बाप, गुरुजींना किती हा ताप! भरती कमी, सेवानिवृत्तीचे प्रमाण अधिक; शिक्षणाचा दर्जा उंचवायचा की…

यावर्षीसुद्धा काही भागांमधून सोयाबीन पिकावर हा प्रादुर्भाव आढळून आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. सध्या पावसाने उसंत घेतली आहे. दिवसाचे तापमान साधारण ३०-३२ अंश सेल्सिअसपर्यंत वाढलेले आहे. त्यामुळे मूळकुज रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. काही विभागामध्ये या रोगाचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात आढळून आला. प्रामुख्याने फुले संगम, जेसअस-९३०५ या वाणावर, मूळकुज रोगाची लक्षणे अधिक प्रमाणात दिसून येत आहेत.

शेताच्या काही भागांमध्ये उतार असेल किंवा ज्या ठिकाणी पाणी साचत असेल अशा काही भागांत झाडाची पाने जमिनीकडे झुकू लागतात. ती पिवळी पडतात. झाडे व पाने वाळण्याची प्रक्रिया सुरू होते. झाड उपटून मुळ बघितल्यास त्याचे साल अलगद निघून येते. मुळे पांढरी पडतात ही प्राथमिक अवस्था आहे. त्यानंतर पीक पूर्णपणे वाळून मुळावर करड्या भुरकट रंगाची बुरशी फळ दिसतात. या अवस्थेत झाड परत दुरुस्त होऊ शकत नाही.

प्राथमिक अवस्था तापमान वाढ आणि सुरुवातीला काही भागांमध्ये पीक पिवळे पडत असेल तर उपाययोजना करावी, असा सल्ला कृषी विद्यापीठाने दिला आहे.

हेही वाचा – चंद्रपूर : बालरोग चिकित्सा विभागात साहित्य खरेदीत लाखोंची उधळपट्टी, वैद्यकीय महाविद्यालयातील प्रकरण, चौकशीची मागणी

ज्या शेतकऱ्यांकडे ओलिताची सोय असेल तर एक संरक्षित ओलीत करणे आवश्यक आहे. पिकाला पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे जर जमीन कोरडी असेल ओलावा नसेल तर मुळे अन्नद्रव्य शोषू शकत नाही. प्रादुर्भावग्रस्त भागात आळवणी करणे आवश्यक आहे. त्यामुळे हा रोग शेतामध्ये वाढणार नाही आणि रोगाची तीव्रता कमी करता येईल. संरक्षित ओलीत उपलब्ध नसल्यास पिकामध्ये पाण्याचा ताण सहन करण्याच्या दृष्टीने तसेच अन्नद्रव्य पुरवठ्याच्या दृष्टीने फवारणी उपयुक्त ठरते. ‘पोटॅशियम नायट्रेट’ची फवारणी पिकांची संभाव्यताणास प्रतिकार क्षमता वाढविते आणि अजैविक घटक म्हणून पिकामध्ये रोगाच्या विरुद्ध प्रतिकारता वाढविते. या रोगाची तीव्रता कमी करण्यासाठी पिकांची फेरपालट करणे आवश्यक आहे. या रोगाची बुरशीफळे ५-७ वर्षे जमिनीत राहतात.

बुरशीला पोषक वातावरण, संवेदनशम वाण आणि पीक शेंगा वाढीच्या अवस्थेत असल्यास रोगाचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात वाढतो, असे कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांकडून सांगण्यात आले.

Story img Loader