महेश बोकडे, लोकसत्ता
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
नागपूर : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, विभागीय केंद्र नागपूर यांनी पुढाकार घेत पूर्व विदर्भातील १८ आदिवासीबहुल गावांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्यानुसार येथील आदिवासी बांधवांमधील आजारांचा सूक्ष्म अभ्यास केला जाईल. हे संशोधन शेवटी केंद्र सरकारला दिले जाणार असल्याने या समाजासाठी धोरण तयार करण्यास मदत होईल. राज्यातील आदिवासींवरील हा सर्वात मोठा प्रकल्प आहे.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनन्ट जनरल (निवृत्त) माधुरी कानिटकर, विद्यापीठाच्या नागपूर विभागीय केंद्राचे समन्वयक डॉ. संजीव चौधरी यांच्या संकल्पनेतून ‘ब्लोसम’ नावाच्या या प्रकल्पासाठी चंद्रपूर-गडचिरोली, गोंदिया- देवरी, नागपूर-रामटेक-पारशिवनी असे तीन विभाग करण्यात आले आहे. प्रत्येक विभागात ९५ टक्क्यांहून अधिक आदिवासी लोकसंख्या असलेल्या ८ गावांची निवड झाली. येथे आदिवासी बांधवांची पडताळणी, विविध तपासणी करण्यासाठी प्रत्येकी २१ सदस्य नियुक्त आहेत. त्यात वरिष्ठ डॉक्टरांपासून आशा वर्कपर्यंतचा समावेश आहे.
हे सदस्य आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, मॉडर्न मेडिसीन, दंत महाविद्यालयाशी संबंधित आहेत. प्रत्येक चमूचे प्रमुख प्राध्यापक दर्जाचे अधिकारी आहे, तर चमूत सहा वैद्यकीय अभ्यासक्रम करणारे विद्यार्थीही असणार आहे. ही चमू १ सप्टेंबर २०२२ ते ३० ऑक्टोबर २०२२ पर्यंतच्या काळात आदिवासी बांधवांपर्यंत जाऊन त्यांचा विश्वास संपादन करत त्यांच्या ‘ब्रेस्ट कॅन्सर’, यकृत, ‘सिकलसेल’, हाड, जीवनशैली, कुपोषणासह इतर आठ पद्धतीच्या आजारांवर बारीक लक्ष ठेवतील. त्यासाठी वैद्यकीय तपासणीसह नि:शुल्क उपचारही केले जाणार आहे. दरम्यान, या सर्व आदिवासी बांधवांच्या नोंदी ‘सेंट्रल इनोव्हेशन लॅब’च्या ‘सॉफ्टवेअर’मध्ये केली जाईल. त्यानंतर ९ तज्ज्ञांची संशोधन समिती १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर दरम्यान या नोंदीचा अभ्यास करेल. या काळात विविध तज्ज्ञ डॉक्टरांकडून या आदिवासी बांधवांमधील आजारांवर उपाययोजना शोधली जाईल. या प्रकल्पातून तयार होणारे संशोधन प्रकाशित करून केंद्र सरकारला दिले जाईल.
आरोग्य विद्यापीठाच्या मदतीने गावांपर्यंत मदत
या प्रकल्पानुसार १८ गावातील ८ ते १० हजार आदिवासी बांधवांपर्यंत संशोधनाच्या निमित्ताने ९० संशोधकांना सूक्ष्म अभ्यास करणे शक्य होईल. त्यानंतर या गावात आरोग्य विद्यापीठ ‘स्टुडंट काऊन्सिल’, ‘एनसीसी’च्या माध्यमातून विविद मदतीचे कार्यक्रम राबवेल. त्यामुळे या गावांना पुढे सलग तीन वर्षे विद्यापीठाकडून उपचारासह इतर कामासाठी मदत मिळत राहील, असे डॉ. संजीव चौधरी म्हणाले.
आरोग्य विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल (निवृत्त) माधुरी कानिटकर यांच्या संकल्पनेतून गोंडवाना विद्यापीठ, आदिवासी विभाग आणि लक्ष्मणराव मानकर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने देशभरातील आदिवासींवरील सर्वात मोठा संशोधन प्रकल्प सुरू होत आहे. या प्रकल्पात मॉडर्न मेडिसीन, आयुर्वेद, होमिओपॅथी, दंत शाखासह इतरही शाखांचा समावेश आहे. हे संशोधन केंद्र सरकारला दिले जाणार असल्याने भविष्यात आदिवासी बांधवांबाबत धोरण तयार करण्यास मदत होईल.
– डॉ. संजीव चौधरी, समन्वयक, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, विभागीय केंद्र, नागपूर.