लोकसत्ता टीम

अमरावती : लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याने एका तरुणीची बदनामी करण्यात आली. तिचा विनयभंग करून धमकी देण्यात आल्‍याची घटना गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

honour killing interfaith marriages
आंतरधर्मीय लग्न करणाऱ्यांसाठी ‘सेफ हाऊस’, ‘ऑनर किलिंग’ थांबवण्याकरिता राज्य सरकारचा पुढाकार
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
woman cheated news loksatta
लग्नाचे आमिष दाखवून पावणे आठ लाखांना लुटले, कर्जत पोलीस ठाण्यात नाशिकच्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल
UP Murder Case
Alimony : पत्नीला पाच लाखांची पोटगी देणं टाळण्यासाठी तरुणाचं भयंकर कृत्य, पत्नीला चंडी देवीच्या दर्शनाला नेलं अन् काढला काटा
Lock in period of marriage court verdict chatura article
विवाहाचा लॉक-इन पिरीयड
Chhattisgarh High Court grants divorce to man due to wife’s refusal to live with in-laws.
“पतीला कुटुंबापासून वेगळे करणे…”, सासू-सासऱ्यांबरोबर राहण्यास नकार देणार्‍या महिलेविरोधात उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
Crime NEws
“मी ब्लॅकमेलिंगला कंटाळले होते”, लैंगिक संबंधांदरम्यानच महिलेने केली हत्या!
tina datta talks about being single mother
३३ वर्षीय अभिनेत्री लग्न न करताच आई होणार? म्हणाली, “पतीवर अवलंबून राहणं…”

गौरव दिलीप वाघमारे रा. हनुमाननगर असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गौरव हा पीडित तरुणीच्या परिचयातील आहे. गौरवने पीडित तरुणीसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता. परंतु, तरुणीसह तिच्या आईने गौरवला नकार दिला. त्यानंतरही गौरव हा पीडित तरुणीला वारंवार फोन करून तुझे लग्न होऊ देणार नाही, अशी धमकी देऊ लागला. तरुणीला बघून तो जोरजोरात शिवीगाळ करायचा. तरुणीसोबत आपले ४ ते ५ वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याचे सांगून त्याने तिची बदनामीही चालविली.

आणखी वाचा-अमरावती : बसस्‍थानकाच्‍या विस्‍तारीकरणाचा प्रस्‍ताव अडगळीत!

पीडित तरुणी रस्त्याने जात असताना गौरवने तिला अडविले. तिला शिवीगाळ करून तुझे कुणाशीही लग्न होऊ देणार नाही, अशी धमकी त्याने तिला दिली. गौरवच्या या सततच्या जाचाला कंटाळून पीडित तरुणीने गाडगेनगर ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी गौरवविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Story img Loader