लोकसत्ता टीम
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
अमरावती : लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याने एका तरुणीची बदनामी करण्यात आली. तिचा विनयभंग करून धमकी देण्यात आल्याची घटना गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गौरव दिलीप वाघमारे रा. हनुमाननगर असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गौरव हा पीडित तरुणीच्या परिचयातील आहे. गौरवने पीडित तरुणीसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता. परंतु, तरुणीसह तिच्या आईने गौरवला नकार दिला. त्यानंतरही गौरव हा पीडित तरुणीला वारंवार फोन करून तुझे लग्न होऊ देणार नाही, अशी धमकी देऊ लागला. तरुणीला बघून तो जोरजोरात शिवीगाळ करायचा. तरुणीसोबत आपले ४ ते ५ वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याचे सांगून त्याने तिची बदनामीही चालविली.
आणखी वाचा-अमरावती : बसस्थानकाच्या विस्तारीकरणाचा प्रस्ताव अडगळीत!
पीडित तरुणी रस्त्याने जात असताना गौरवने तिला अडविले. तिला शिवीगाळ करून तुझे कुणाशीही लग्न होऊ देणार नाही, अशी धमकी त्याने तिला दिली. गौरवच्या या सततच्या जाचाला कंटाळून पीडित तरुणीने गाडगेनगर ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी गौरवविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.