चंद्रपूर : जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष तथा काँग्रेस नेते संतोषसिंह रावत यांच्यावर गोळीबार करणाऱ्या काँग्रेसच्या उत्तर भारतीय सेलचे जिल्हाध्यक्ष आरोपी राजवीर व अजय यादव यांच्या ‘नार्कोटेस्ट’च्या मागणीऐवजी काँग्रेस शहर व प्रभारी जिल्हाध्यक्ष रामू तिवारी यांनी बँकेच्या सर्व संचालकांच्या ‘नार्कोटेस्ट’ची मागणी करणे हा आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न आहे. तिवारी यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करत जिल्हा बँकेच्या काँग्रेसच्या सर्व संचालकांनी रामू तिवारी यांना शहर व जिल्हाध्यक्ष पदावरून बडतर्फ करावे, अशी मागणी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिल्हा बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांच्यावरील गोळीबाराचे प्रकरण येथे चांगलेच गाजत आहे. या प्रकरणामुळे माजी मंत्री विजय वडेट्टीवार व खासदार बाळू धानोरकर समर्थक आता आपसात भिडले आहेत. काँग्रेस शहर अध्यक्ष तिवारी यांनी बँकेच्या सर्व संचालकांची नार्काे टेस्ट करावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर बँकेचे उपाध्यक्ष यशवंत दिघोरे, संचालक संदीप गड्डमवार, रवींद्र शिंदे, डॉ. विजय देवतळे, पांडुरंग जाधव, संजय तोटावार, राजेश रघाताटे, ललित मोटघरे यांनी पत्रपरिषद घेऊन तिवारी यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध नोंदवत त्यांना शहर व जिल्हाध्यक्ष पदावरून बडतर्फ करावे, अशी मागणी केली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dismiss congress district president tiwari chandrapur district bank director request to the state president rsj 74 ssb
Show comments