नागपूर : केंद्रीय राखीव पोलीस दलातील जवानाने अमरावतीच्या एका तरुणीवर सीताबर्डीतील एका ओयो हॉटेलमध्ये नेऊन बलात्कार केला. याप्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. बृजेश तोमर (३४), रा. अलीगड, उत्तर प्रदेश असे आरोपीचे नाव आहे.
पीडित २१ वर्षीय तरुणी अमरावती येथील रहिवासी असून सध्या शिक्षण घेत आहे. ‘सीआरपीएफ’चा जवान बृजेश याची तैनाती २०१९ मध्ये विजयवाडा येथे होती. या दरम्यान इंस्टाग्रामवर त्याची अमरावतीच्या तरुणीशी मैत्री झाली. त्याने ‘सीआरपीएफ’मध्ये अधिकारी असल्याचे सांगून तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. १० फेब्रुवारी २०२३ रोजी त्याला ‘सीआरपीएफ’मधून बडतर्फ करण्यात आले. ही गोष्टही त्याने तरुणीपासून लपवली.
हेही वाचा – नागपूर : पोलीस अधिकाऱ्यांचीच विभागीय चौकशी करा, प्रमोद मनमोडे यांची न्यायालयात याचिका
५ एप्रिलला बृजेशने तरुणीला भेटण्यासाठी नागपूरला बोलावले. सीताबर्डीतील एका ओयो हॉटेलमध्ये घेऊन गेला. तिला लग्न करण्याचा विश्वास दिला. त्यानंतर त्याने तिच्याशी बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर त्याने लग्न करण्यास नकार दिला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणीने सीताबर्डी पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी अलीगडवरून बृजेशला अटक केली