अकोला : काँग्रेसची विस्तारित जिल्हा कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर यांनी जाहीर केल्याच्या २४ तासांच्या आत एका उपाध्यक्षाने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. संजय बोडखे यांनी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हाध्यक्षांकडे दिला. त्यामुळे काँग्रेस पक्षातील नाराजी कायम असल्याचे दिसून येते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – भंडारा : अजित पवारांच्या भाषणादरम्यान ‘प्रहार’चा गोंधळ, ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात ‘खुर्च्या खाली करा’ची घोषणा

हेही वाचा – नाना पटोले म्हणतात, “मोदी जेथे जातात तेथे पराभव अटळ, भारतीय संघ जिंकला असता तर…”

जिल्हा काँग्रेसच्या कार्यकारिणीचा विस्तार गेल्या काही महिन्यांपासून रखडला होता. अखेर प्रदेशाध्यक्षांच्या मंजुरीनंतर जिल्हाध्यक्षांनी विस्तारित कार्यकारिणी जाहीर केली. विस्तारित कार्यकारिणी वरिष्ठ उपाध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस, कोषाध्यक्ष, चिटणीसांसह तब्बल २६६ पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. या कार्यकारिणीत उपाध्यक्ष म्हणून संजय बोडखे यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी वैयक्तिक कारण पुढे करून आपल्या पदाचा राजीनामा जिल्हाध्यक्षांकडे सादर केला आहे.