नागपूर: शेतकरी, उद्योजक, पथविक्रेते यांच्यासह इतरही घटकांना अर्थसहाय्य करणाऱ्या अनेक योजना केंद्र सरकारकडून बँकांच्या माध्यमातून राबवल्या जातात. यात राष्ट्रीयकृत बँकांचे योगदान मोलाचे असले तरी खासगी क्षेत्रातील बँकांचे अपेक्षित सहकार्य मिळत नाही. यासंदर्भात या महिन्या अखेर या बँकांची बैठक घेऊन त्यांना आवश्यक त्या सूचना केल्या जातील, असे केंद्रीय अर्थराज्य मंत्री डॉ .भागवत कराड यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

केद्र सरकारच्या विविध योजनांची विदर्भातील अंमलबजावणी संदर्भात कराड यांनी विविध बँकांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कराड म्हणाले, केंद्र सरकारच्या जनधन योजनेतून पन्नास कोटींहून अधिक खाते बँकांमध्ये उघडण्यात आली. देशात प्रथमच राष्ट्रीयकृत बँंका नफ्यात आल्या आहे. त्यांना १ लाख ४ हजार कोटींचा नफा झाला आहे. बँकांचा एनपीए कमी झाला आहे. कार्पोरेट क्षेत्रातील एनपीएचे प्रमाण कमी झाले आहे.

mita shetty
टाटा इंडिया इनोव्हेशन फंडाची कामगिरी कशी राहील?
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
rs 28677 crore withdrawn by foreign investors from stock market
शेअर बाजाराकडे परदेशी गुंतवणूकदारांची पाठ? बाजार कोसळण्याचे तेच एक कारण?
p chidambaram article analysis maharashtra economy
समोरच्या बाकावरून : अर्थव्यवस्था तारेल त्यालाच मत
congress leader rahul gandhi made serious allegations on pm modi in jharkhand
पंतप्रधान बड्या उद्योजकांचे हित जोपासतात; राहुल गांधी यांचा आरोप
loksatta editorial no interest rate cut by rbi retail inflation surges in october
अग्रलेख : म्हाताऱ्या शब्दांचा आरसा…
readers comments on Loksatta editorial,
लोकमानस : अर्थव्यवस्थेत वाढ, मग रुपयाची घसरण का?
public banks profit increase by 26 percent in first half fy 25
सरकारी बँकांच्या नफ्यात सहामाहीत २६ टक्के वाढ

हेही वाचा >>> शेतकरी आत्‍महत्‍यांचे सत्र सुरूच, अमरावती जिल्ह्यात दोन दिवसांत तीन शेतकऱ्यांनी संपविली जीवनयात्रा

केंद्र सरकारच्या योजना राबवण्यात राष्ट्रीयकृत बँकांचा सहभाग सकारात्मक स्वरुपाचा असला तरी खासगी क्षेत्रातील बँकांचा सहभाग कमी आहे. तो वाढवण्यासाठी या बँकांच्या अध्यक्षांची लवकरच दिल्लीत बैठक बोलवण्यात येईल. दोन हजार रुपयांची नोट बंदीबाबत तसेच पुढच्या वर्षी निवडणुका असल्याने केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार का याबाबत कराड यांनी बोलणे टाळले. विदर्भात शेतकरी आत्महत्या होत असताना बँका कर्ज वाटप करीत नाही, याकडे त्यांचे लक्ष वेधले असता त्यांनी याबाबत सर्वसंबधितांना सूचना दिल्या आहे, असे सांगितले.