नागपूर: विधानसभेच्या सर्वच पक्षांतील आमदार छायाचित्र घेण्यासाठी गुरुवारी सकाळी १०.३० वाजता विधानसभेच्या पायरीजवळ हजर झाले. परंतु मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री छायाचित्रणासाठी येथे पोहोचले नाही. त्यानंतर हा कार्यक्रम स्थगित झाल्याने सर्वांनी नाराजी व्यक्त केली. परंतु दुपारी १२ वाजता अखेर छायाचित्र काढले गेले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – पीएचडीबाबतच्या वक्तव्यावरून पेटलेल्या दिव्यावर अजितदादांची दिलगिरीची फुंकर! म्हणाले, “नेत्यांवर पीएचडी करणे…”

हेही वाचा – १२५ व्या वर्षी घेतला जगाचा निरोप, वाशीमच्या आमखेडा गावातील सुंदरबाईंचे निधन

विधानसभेतील सर्व आमदारांना सकाळी १०.५० वाजताची वेळ छायाचित्र घेण्यासाठी दिली होती. त्यानुसार सगळ्याच पक्षाचे आमदार विधानसभेच्या पायरीजवळ हजर झाले. परंतु १० ते १५ मिनिटे झाली तरी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री तेथे पोहोचले नाहीत. त्यामुळे भास्कर जाधव, जयंत पाटील आणि सर्वच पक्षांच्या आमदारांनी विधान सभेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे नाराजी बोलून दाखवली. यानंतर छायाचित्रासाठी वेळ बदलून दुपारी १२ वाजताची वेळ दिली गेली. दरम्यान दुपारी १२ वाजता सर्व पक्षाचे आमदार पुन्हा येथे एकत्र आले. त्यानंतर येथे सर्वांचे सामूहिक छायाचित्र काढले गेले. यावेळी महिला आमदार, विविध आमदारांनी स्वतःचे वेगवेगळे छायाचित्रही काढून घेतले. यावेळी वेगवेगळ्या पक्षांच्या आमदारांमध्ये गप्पा-विनोद रंगले होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Displeasure over group photo of mla in vidhan bhavan in nagpur mnb 82 ssb