वर्धा : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वर्धा की हिंगणघाट अश्या वादात हिंगणघाटकरांनी रान पेटवून हे महाविद्यालय खेचून आणले. परंतू आता जागा शासकीय की खाजगी असा नवा वाद सुरू झाला आहे. आमदार समीर कुणावार विरूद्ध अन्य सर्व पक्षीय असे या वादाला छुपे स्वरूप आहे. शहरात हा मुद्दा अत्यंत संवेदनशील झाला असून वेगवेगळ्या स्वरूपात त्याचे पडसाद उमटत आहे. हिंगणघाट विधानसभा या नावाचा व्हॉट्सॲप ग्रुप आहे. त्यावर प्रस्तावीत वैद्यकीय महाविद्यालयाबाबत चर्चा सुरू असतांना वैभव त्रिवेदी याने शिविगाळ करणे सुरू केली, अशी पोलीस तक्रार युवराज गजानन माऊस्कर या युवकाने केली.

त्यानंतर रात्री वैभव त्रिवेदी व वेदांत सावरकर यांनी युवराजच्या मोबाईलवर फोन करून एका शाळेजवळ बोलविले. युवराज हा प्रथमेश दौलतकारसह त्या ठिकाणी पोहचल्यावर अमलेश त्रिवेदीसोबत बोलणे सुरू असतांना आदर्शने प्रथमेश दौलतकार याला मारहाण सुरू केली. हे भांडण सोडविण्यास गेलेल्या युवराजला अमलेश त्रिवेदी याने काठीने मारहाण करणे सुरू केली. तसेच दगडाने पोटावर वार केला. यातून कसेबसे सुटका करत युवराज व मित्राने पळ काढत पोलीस स्टेशन गाठले. एकूणच हिंगणघाटचे वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रकरण चांगलेच गाजत आहे.

99 Accused from Nagpur City Tadipaar Assembly Election 2024
निवडणुकीच्या धामधुमीत ९९ आरोपी तडीपार…गेल्या १० वर्षात पहिल्यांंदाच…
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
Supreme Court on bulldozer action (1)
अतिक्रमणविरोधी कारवाईवेळी ‘हे’ नियम पाळा, थेट सर्वोच्च न्यायालयानंच घालून दिली नियमावली!
Viral VIDEO: Drunk Constable Unzips And Urinates In Middle Of Road Outside Police Station In Agra
दारूच्या नशेत पोलिसांचे लज्जास्पद कृत्य, रस्त्याच्या मधोमध पँटची चेन उघडली अन्…; घटनेचा VIDEO व्हायरल
Municipal corporation Thane, illegal hoarding holders Thane, illegal hoarding Thane,
ठाण्यात ५२ बेकायदा होर्डिंगधारकांना पालिकेच्या नोटीसा, १० कोटी ९६ लाखांचा दंड पालिका करणार वसूल
bombay hc reject builder bail over illegal housing projects
बेकायदा गृहप्रकल्प राबवणाऱ्यांवर कारवाई गरजेची; विकासकांना जामीन नाकारताना उच्च न्यायालयाची टिप्पणी
TET, AI, TET malpractices, TET news, TET latest news,
‘टीईटी’वर आता एआय ठेवणार नजर… गैरप्रकार रोखण्यासाठीच्या उपाययोजना काय?
bombay high court slams bmc officer over cm order
मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला महत्व नाही का? उच्च न्यायालयाची महापालिका प्रशासानाला विचारणा

हेही वाचा…‘लाडक्या बहिणी’चा पीक विम्‍याला फटका! केवळ ३.३६ लाख शेतकऱ्यांचा सहभाग, अखेर…

मद्यधुंद बसचालक व वाहक निलंबीत

आषाढी वारीसाठी ४५ वारकऱ्यांना घेवून खास बस पंढरपूर वारीसाठी रवाना झाली होती. प्रवासात असतांना या बसला पुसद येथे अपघात झाला. तेव्हा चालक मद्यप्राशन करून बस चालवित असल्याची माहिती पुढे आली. पुसद येथील माहुर फाट्याजवळ नशेत असलेल्या चालकाकडून रस्ता दुभाजकला बस धडकली. बसमधील प्रवासी थोडक्यात बचावले. मात्र एक वयोवृद्ध महिला व मुलगा जखमी झाला. उपस्थित नागरिकांच्या चालक व वाहक नशेत असल्याचे लक्षात आले. त्यांनी चालकाच्या बॅगची तपासणी केल्यावर त्यात दारूच्या बाटल्या आढळून आल्या. पुसद पोलीसांनी चालकाला ताब्यात घेतले. या अपघाताची माहिती एस टी मंडळाचे विभागीय नियंत्रक संदीप रायमुलकर यांना मिळाली. त्यांनी बसचालक सचिन गंगाधर गव्हाणे व वाहक प्रदीप ज्ञानेश्वर सुर्यवंशी यांच्यावर निलंबनाचा बडगा उगारला.

हेही वाचा…महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील पाटणबोरी आंतराराज्य जुगाराचे केंद्र; ‘सोशल क्लब’च्या नावाखाली…

भुरट्या चोरांचा हैदोस

हिंगणघाट येथील प्रवीण भुसारी हे कामावर गेले असतांना व पत्नी शेजारी गेली असतांना भुरट्या चोरांनी घराचे कुलूप तोडून ६७ हजार रूपयाचे दागिणे व रोखरक्कम लंपास केली. आष्टी येथील शिक्षीका मंजुशा वासुदेवराव गजाम या कुटुंबासह बाहेर गावी गेले असतांना त्यांचे घर चोरट्यांनी साफ केले. त्या घरी परतल्यावर घराचे कुलूप तोडल्याचे दिसून आले. तसेच घरातील सामान अस्ताव्यस्त पडून होते. त्यांनी तपासणी केल्यावर विविध दागदागिणे व रोखरक्कम चोरट्यांनी लंपास केल्याचे आढळले.