लोकसत्‍ता टीम

अमरावती : एका तरुणाने स्वत:च्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेत आत्‍महत्‍येचा प्रयत्‍न केल्‍यानंतर त्‍याची रुग्‍णालयात सुश्रूषा करण्‍यासाठी आलेल्‍या पत्‍नीने रुग्‍णालयातच आत्‍महत्‍या केली. १३ नोव्‍हेंबरला घडलेल्‍या या घटनेनंतर काही तासांत पतीचाही मृत्‍यू झाला. दोघा पती-पत्‍नीच्‍या आत्‍महत्‍या प्रकरणी वेगळेच कारण समोर आले आहे. मृत तरूणाच्या वडिलांच्या तक्रारीवरून एका आरोपीच्‍या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Udayanraje Bhosale angry on actor rahul solapurkar
“… त्याला गोळ्या घातल्या पाहिजेत”, राहुल सोलापूरकरच्या विधानावार खासदार उदयनराजे भोसलेंची संतप्त प्रतिक्रिया
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Sanjay raut on all part mps meeting
खासदारांच्या बैठकीला मुहूर्तच मिळेना; नवीन खासदारांची एकही बैठक नाही
Eknath shinde loksatta news
रायगड, नाशिकच्या पालकमंत्रीपदांचा तिढा लवकरच सुटेल – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Couple commit suicide by jumping under running train
विक्रोळी रेल्वे स्थानकात युगुलाची मेल एक्स्प्रेस गाडीखाली आत्महत्या
Supriya Sule in audience in Ajit Pawar event
नाराजीनाट्याचा पुढचा अंक इंदापुरात! नक्की काय घडले ? अजित पवार व्यासपीठावर तर खासदार सुप्रिया सुळे प्रेक्षकांत
Girish Mahajan On Nashik and Raigad Guardian Minister
Girish Mahajan : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा कधी सुटेल? गिरीश महाजनांचं मोठं विधान; म्हणाले, “आता हा प्रश्न…”
competition between Ashok Chavan and Pratap Patil Chikhlikar over party defection
अशोक चव्हाण – चिखलीकरांमध्ये पक्षांतरावरून स्पर्धा

प्रकाश जगन शिंदे (२७) रा. माळेगाव असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सुरेश सावंत (३५) रा. माळेगाव असे मृताचे नाव आहे. त्याने ११ नोव्हेंबर रोजी सकाळी शिवारातील आपल्या शेतात जाऊन पेटवून घेतले होते. १३ नोव्हेंबर रोजी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. आरोपी प्रकाश हा सुरेश यांच्या पत्नीला मोबाइलवर संपर्क साधत होता. या कारणावरुन सुरेश व प्रकाश यांचे ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास भांडण झाले. त्यावेळी प्रकाशने सुरेशला लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन शिवीगाळ केली होती. त्यामुळे सुरेशने शेतात जाऊन स्वत:ला जाळून घेतले. त्यांच्यावर येथील डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यामुळे त्याची पत्नी आरतीदेखील रुग्णालयातच मुक्कामाला होती.

आणखी वाचा-भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माचे नागपूर कनेक्शन…

१३ नोव्हेंबर रोजी सकाळी रुग्णालयातील कठड्याला साडीच्या सहाय्याने गळफास लावत आत्महत्या केली होती. त्या प्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. आपल्या मृत्यूपूर्व जबाबात प्रकाशने लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याने आपल्याला ते अपमानजनक वाटले. त्यामुळे आपण जाळून घेतल्याचे सुरेशने म्हटले होते. त्यामुळे मृताचा मृत्यूपूर्व जबाब व त्याचे वडील शिवनाथ सावंत (६०) रा. माळेगाव यांच्या तक्रारीच्या आधारावर कुऱ्हा पोलिसांनी आरोपी प्रकाश शिंदे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Story img Loader